शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘चिल्ड वॉटर’ शुद्ध किती?

By admin | Updated: July 9, 2017 01:34 IST

नागपुरात मोहल्ल्या-मोहल्ल्यात आणि गल्लीबोळात ‘चिल्ड वॉटर कॅन’चा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे.

गल्लीबोळांत सुरू आहेत ४०० वर अवैध मिनी प्रकल्प : रोज लाखो लिटर भूमिगत पाण्याचा धंदा राहुल अवसरे/सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात मोहल्ल्या-मोहल्ल्यात आणि गल्लीबोळात ‘चिल्ड वॉटर कॅन’चा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. सुमारे ४००वर ठिकाणी हे मिनी प्रकल्प बिनधास्त सुरू आहेत. लोकमत चमूने केलेल्या चौकशीत हा व्यवसाय करण्याचे अधिकृत परवाने कुणाकडेही नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. भविष्यात या चिल्ड वॉटरमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध तरीही व्यवसाय जोमात या व्यवसायाला अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी नाही. २५ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. इतरांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीसेस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, लोकमत चमूला कुणीही प्रकल्प बंद केलेले नसल्याचे आढळून आले. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांचेही बिनधास्त व्यवसाय सुरू आहेत. तर प्रशासन हा व्यवसायच बंद करण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. गलिच्छ ठिकाणीच ‘प्रकल्प’ अधिक लोकमत चमूने या व्यवसायाचा कानोसा घेतला असता, ‘चिल्ड वॉटर कॅन’चा हा व्यवसाय वस्त्यांमध्येच सर्वाधिक आहे. या व्यवसायासाठी लावण्यात आलेले बहुतांश ‘आॅरो प्लांट’ हे गलिच्छ व अडगळीच्या ठिकाणी आहेत. या प्रकल्पाच्या आजूबाजूला घाण, कचरा, सांडपाण्याच्या नाल्या आहेत. माशा घोंगावत असल्याचे नेहमीचे चित्र आहे. ‘कॅन’च्या स्वच्छतेकडेही काही व्यावसायिक दुर्लक्ष करताना दिसून आले. वस्त्यांच्या ठिकाणी नळाचे अवैध कनेक्शन घेतल्याचेही आढळून आले. वस्त्यांमध्येच हा व्यवसाय असल्याने महापालिकेच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर हे व्यावसायिक वापर करीत आहेत. बहुतांश व्यावसायिक हे बोअरवेलचे पाणी वापरतात, काही विहिरीचे पाणी तर काही खासगी टँकरच्या पाण्याचा वापर करतात. कॅटरर्सची बनवाबनवी काही कॅटरर्स जास्त नफा कमाविण्यासाठी यांच्याकडून कमी ‘कॅन’ घेतात. कॅनचे पाणी संपताच हे कॅटरर्स सभागृहातील पाणी कॅनमध्ये भरतात. यामुळे याचा गंभीर परिणाम सामान्य लोकांच्या आरोग्यावर होऊन त्यांना याची किंमत चुकवावी लागते. गंभीर स्वरुपाचा गुन्हा विना ‘बी.आय.एस.’ प्रमाणपत्र पाण्याची विक्री करणे अवैध आहे. विनापरवाना व्यवसाय करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. या नियमाला धरून २५ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील एकावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. तर २३ प्रकरणे खटल्याच्या मंजुरीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहेत. एक प्रकरण अन्न सुरक्षा अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे. दर महिन्याला २० पेढ्यांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट असले तरी निरीक्षकांच्या पुरेशा संख्या बळाअभावी ते पूर्ण होणे शक्य नाही. -मिलिंद देशपांडे सहायक आयुक्त, अन्न प्रशासन