शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हा कसला पार्किं ग प्लाझा?

By admin | Updated: June 22, 2017 01:57 IST

सीताबर्डीसारख्या वर्दळीच्या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते.

नासुप्र्र झोपेत, नागरिक त्रस्त तर कशी सुटेल वाहतुकीची कोंडी ? आॅपरेटरकडून प्रतिसाद नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सीताबर्डीसारख्या वर्दळीच्या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी होते. यावर पर्याय म्हणून नागपूर सुधार प्रन्यासने (नासुप्र) खासगी विकासकाच्या माध्यमातून व्हेरायटी चौकात अमरावती मार्गावर पार्किंग प्लाझाचे बांधकाम केले. २०१३ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. परंतु काही महिन्यातच पार्किंगची व्यवस्था बंद करण्यात आली. तीन वर्षांनी देखभालीसाठी नासुप्रकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. परंतु तो बंदच असल्याने पार्किंग प्लाझा पांढरा हत्ती बनला आहे. रॉय उद्योग समूहाने टीडीआरच्या मोबदल्यात हा प्रकल्प उभारला. येथे ७३ चारचाकी वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे. सुरुवातीला तीन वर्षे प्रायोगिक तत्त्वावर विकासकाने हा प्रकल्प चालवायचा होता. त्यानंतर यासाठी नवीन आॅपरेटर शोधण्याची नासुप्रची जबाबदारी होती. परंतु गेल्या वर्षभरात नवीन आॅपरेटर शोधण्यात नासुप्रला यश मिळालेले नाही. नवीन आॅपरेटकडून प्रतिसाद नाही. त्यामुळे पार्किंग प्लाझा वापराविना पडून असल्याने नासुप्र हतबल असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रकल्पाचे बांधकाम सदोष आहे. त्यामुळे हा प्रकल्प चालविण्यासाठी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. मोठ्या आकाराच्या कार पार्किंग करताना अडचणी येतात. त्यामुळे हा प्रकल्प बंद पडला आहे. सीताबर्डी भागात चारचाकी वाहनधारकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी, सोबतच ग्राहकांवर जादा आर्थिक भुर्दंड पडणार नाही, असे दोन्ही हेतू साध्य करून हा प्रकल्प ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर चालविणे अपेक्षित होते. मात्र यात अद्याप यश आलेले नाही. सीताबर्डी पसिरात पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध नसल्याने खासगी सहभागातून बहुमजली पार्किंगचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय नासुप्रने घेतला होता. प्रकल्प उभा राहिला परंतु आता तो चालवायचा कसा असा यक्षप्रश्न नासुप्रपुढे उभा ठाकला आहे. प्रकल्प सुरू राहावा, सोबतच याचा आर्थिक बोजा पडणार नाही अशा स्वरुपात प्रकल्प चालविण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिली.