शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘ नागपूर फर्स्ट सिटी’चे किती काम पूर्ण झाले? हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 10:52 IST

मिहानमधील फर्स्ट सिटी या गृह प्रकल्पाचे आतापर्यंत किती काम पूर्ण झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व कंत्राटदार चौरंगी बिल्डर्सला करून यावर दोन आठवड्यांत वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देमिहानमधील गृह प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानमधील फर्स्ट सिटी या गृह प्रकल्पाचे आतापर्यंत किती काम पूर्ण झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व कंत्राटदार चौरंगी बिल्डर्सला करून यावर दोन आठवड्यांत वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला.प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे ग्राहकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने ग्राहकांनाही त्यांना फ्लॅट हवे आहेत की कर्जातून मुक्त व्हायचे आहे, अशी विचारणा करून यावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. हा विमानतळ विकास कंपनीचा प्रकल्प असून त्याचे कंत्राट चौरंगी बिल्डर्स (पूर्वीचे रिटॉक्स) यांच्याकडे आहे. कंपनी व बिल्डर्समधील भांडणामुळे हा प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही. ग्राहकांनी फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असल्यामुळे तेदेखील अडचणीत आले आहेत. प्रकल्प तातडीने पूर्ण करून फ्लॅटस्चा ताबा देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

थकीत कर्ज परतचौरंगी बिल्डर्सने विजया बँकेचे १२० कोटी रुपयांचे थकीत कर्ज परत केले असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसोबतचा वादही मिटला आहे. चौरंगी बिल्डर्स ज्या ग्राहकांना प्राथमिक रक्कम (मुद्दल) परत हवी आहे, त्यांना ती देत आहे. त्यासोबतच पूर्वीच्या दराने ज्यांना सदनिका ठेवायच्या आहेत त्यांना देण्यात येत आहेत, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने लोकमतला दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय