शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित श्रमिकांसाठी किती रेल्वे चालविल्या; हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 09:43 IST

स्थलांतरित श्रमिकांना आपापल्या घरी जाता यावे याकरिता आतापर्यंत किती रेल्वे चालविण्यात आल्या व त्या रेल्वेंमधून नागपुरातील किती श्रमिकांना पाठविण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाला केली व यावर १९ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्दे रेल्वे मंत्रालयाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थलांतरित श्रमिकांना आपापल्या घरी जाता यावे याकरिता आतापर्यंत किती रेल्वे चालविण्यात आल्या व त्या रेल्वेंमधून नागपुरातील किती श्रमिकांना पाठविण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाला केली व यावर १९ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शेजारी राज्ये आणि विविध जिल्ह्यांतील हजारो श्रमिक नागपुरात येऊन घरकाम, बांधकाम, वाहनचालक, माळीकाम, रोजमजुरी, किरकोळ वस्तूंची विक्री इत्यादी माध्यमांतून अर्थार्जन करीत होते. त्यातून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार इत्यादींवरचा खर्च भागत होता. परंतु, कोरोना नियंत्रणासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला. अर्थार्जन बंद झाले. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. इतर खर्च भागवणेही अशक्य झाले. सरकारने त्यांना घरी पोहचवून देण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलली नाहीत. परिणामी, स्थलांतरित श्रमिकांचा संयम सुटला व हजारो श्रमिक आपापल्या घरी पोहचण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर त्यांचे खाण्यापिण्यावाचून व आवश्यक सुविधांअभावी होत असलेले हाल पाहून उच्च न्यायालयाने याविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात गेल्या तारखेस रेल्वे मंत्रालयाला प्रतिवादी करून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार, रेल्वेचे वकील अ‍ॅड. नितीन लांबट न्यायालयात हजर झाल्यानंतर वरील आदेश देण्यात आला. न्यायालय मित्र अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.रेल्वे तिकिटांसाठी ५७ कोटीस्थलांतरित श्रमिकांच्या रेल्वे तिकिटांसाठी राज्य सरकारने ५७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. रेल्वे प्रवासाकरिता श्रमिकांकडून पैसे घेतले जात नाहीत. राज्य सरकार रेल्वेला श्रमिकांची यादी देते व आवश्यक तिकिटे खरेदी करते, अशी माहिती सुनावणीदरम्यान न्यायालयाला देण्यात आली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय