शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती-मलकापूर रोड कधीपर्यंत दुरुस्त करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST

नागपूर : नागपूर-अमरावती-मलकापूर रोडची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे अपघात वाढले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात ...

नागपूर : नागपूर-अमरावती-मलकापूर रोडची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे अपघात वाढले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची कानउघाडणी केली, तसेच हा रोड कधीपर्यंत दुरुस्त करता, असा सवाल विचारून एक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात ॲड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका अमरावती-मलकापूर रोडपुरती मर्यादित होती. न्यायालयाने बुधवारी याचिकेची व्याप्ती वाढवून त्यात नागपूर-अमरावती रोडचाही समावेश केला. हा रोडदेखील अत्यंत खराब झाला आहे. कंत्राटदाराने गेल्या अनेक महिन्यापासून रोडची दुरुस्ती केली नाही. परिणामी, हा रोड वाहनचालकांसाठी खूप त्रासदायक झाला आहे. न्यायालयाने स्वत: याचा अनुभव घेतला असल्याचे महामार्ग प्राधिकरणच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

अमरावती-मलकापूर रोडचे चौपदरीकरण गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. २०१९ मध्ये प्राधिकरणने अमरावती-मलकापूर रोडचे काम ७० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर सत्य शोधून काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने प्राधिकरणचा दावा खोटा ठरवला होता. परिणामी, न्यायालयाने आतापर्यंत हा रोड नाहीसा झाला असेल, असे ताशेरे प्राधिकरणवर ओढले, तसेच नागपूर-अमरावती-मलकापूर रोडची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

------------

कंत्राटदार टोल घेतो, दुरुस्ती करीत नाही

कंत्राटदाराद्वारे नागपूर-अमरावती रोडवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल केला जातो. परंतु, या रोडची नियमित दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे हा रोड अत्यंत खराब झाला आहे. या रोडवर अपघात होत आहेत. त्यात प्राणहानी होत आहे, असे न्यायालयाने ठळकपणे नमूद केले.