शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

- तर कसे मारणार बसपा मैदान ?

By admin | Updated: February 19, 2017 02:15 IST

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत बसपाच्या ७० ते ८० जागा निवडून आणण्याचा दावा प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रदेश प्रभारी उपासक

प्रदेशाध्यक्ष-प्रभारी यांची एकही सभा नाही : उमेदवारांमध्येही खदखद नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीत बसपाच्या ७० ते ८० जागा निवडून आणण्याचा दावा प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रदेश प्रभारी उपासक यांनी केला होता. बसपाशिवाय महापौर होणार नाही, असा दावाही केला जात होता. परंतु प्रचाराच्या शेवटचा दिवस आला तरी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रभारी उपासक यानी उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही जाहीर सभा घेतली नाही. गरुड-उपासक यांनी प्रचाराकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याने असंतुष्ट कार्यकर्त्यांसोबतच उमेदवारांमध्ये सुद्धा खदखद वाढली आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून विदर्भात तळ ठोकून होते. दर आठवड्याला आढावा बैठका घेतल्या जात होत्या. परंतु खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली. सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, अशोक चव्हाण, प्रकाश आंबेडकर, प्रफुल्ल पटेल, खा. असदुद्दीन ओवेसी आदी नेत्यांच्या आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाल्या. परंतु बसपाचे प्रदेशाध्यक्ष व प्रभारी यांनी मात्र प्रचाराकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले. प्रचाराचा शेवटचा दिवस येऊन ठेपला आहे. परंतु या दोघांची एकही सभा आतापर्यंत झालेली नाही. (प्रतिनिधी) लढाईच्या वेळी कुठे गेले नेते निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष व प्रभारी नागपुरात वारंवार येऊन मोठमोठी भाषणे देऊन जायचे. परंतु आता खरी लढाई (निवडणूक) सुरू असताना हे नेते कुठे गेले, असा प्रश्न बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धम राऊत यांनी उपस्थित केला आहे. नागपुरात प्रदेश सचिव, मंडळ समन्वयक, जिल्हाध्यक्ष आणि मोठमोठे पदाधिकारी आहेत. परंतु त्यापैकी कुणी आपल्या पत्नीच्या, कुणी मुलाच्या तर कुणी भावाच्या प्रचारातच व्यस्त असल्याचेही त्यांनी सांगितले.