शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

कसे लागणार सुपरफास्ट निकाल ?

By admin | Updated: December 21, 2015 03:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता.

नागपूर विद्यापीठ : केवळ १० परीक्षांचेच निकाल जाहीरयोगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या कल्पनेतील ही ‘बुलेट ट्रेन’ ढक्कलगाडीच निघाली आहे. डिसेंबर महिन्याचा चौथा आठवडा सुरू होऊनदेखील विद्यापीठाला केवळ दहाच परीक्षांचे निकाल लावण्यात यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ८ परीक्षांमधील परीक्षार्थ्यांची एकूण संख्या केवळ २४ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा दावा पूर्णत: ‘फेल’ झाला असल्याचेच दिसून आले आहे.नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चिंता असते ती निकाल कधी लागतील याची. हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला १९ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल व पहिल्या टप्प्याचे निकाल नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जाहीर करण्यात येतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु आतापर्यंत मात्र केवळ १० परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी या दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. निकालांचा एकूण वेग पाहता हिवाळी परीक्षांचे सर्व निकाल लागण्यासाठी मार्च महिना उजाडणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.८ परीक्षांतील विद्यार्थीसंख्या अवघी २४विद्यापीठाने आतापर्यंत जे १० निकाल लावले आहेत, त्यातील ८ परीक्षांतील विद्यार्थ्यांची संख्या अवघी २४ आहे. ४ परीक्षांमध्ये अवघा एक परीक्षार्थी आहे. ‘बीएफए’च्या प्रथम व अंतिम वर्षाचे निकालदेखील जाहीर झाले आहेत. यातील अर्ध्याहून अधिक निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहेत.४५ दिवस उलटले, आता काय ?निकाल लावण्यासाठी दिवसांचे बंधन नाही, असे प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना अनेकदा सांगण्यात येते. परंतु महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार परीक्षेच्या अखेरच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत आणि कोणत्याही परिस्थिती उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर व्हायला हवा, असे राज्य शासनाकडून विधिमंडळात मागील आठवड्यातच स्पष्ट करण्यात आले होते. अनेक परीक्षा संपून आता ४५ दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचे यावर काय पाऊल राहणार हादेखील कळीचा प्रश्न आहे.