चिमुकल्यांच्या मनातील प्रश्न : सकाळच्या शाळांची वेळ बदलण्याबाबत विचार हवानागपूर : कडाक्याची थंडी म्हटली की सकाळी ऊबदार दुलईतून लवकर उठण्याची घरातील वयस्कांचीदेखील इच्छा होत नाही. अशास्थितीत चिल्ल्यापिल्ल्यांची काय अवस्था होत असेल? परंतु सकाळच्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना नाईलाजास्तव कुडकुडत का होईना पण लवकर उठून शाळेत जावेच लागते. याचा परिणाम त्यांचा अभ्यास, उत्साह अन् कुठेतरी मानसिकतेवर होतो. अशा थंडीमध्ये शहरातील सकाळच्या शाळांनी वेळ बदलविण्यावर विचार करावा, अशी मागणी निरनिराळ्या स्तरातील पालकांकडून समोर यायला लागली आहे. यंदाच्या वर्षी नागपुरात ‘रेकॉर्डब्रेक’ थंडी पडली. या थंडीमुळे वर्षभर नित्यनेमाने ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्यांनी ऊन पडल्यावरच फिरायला जाणे सुरू केले. तर अनेकांनी सुमारे महिनाभरासाठी हा विचारच सोडून दिला. परंतु अशास्थितीत सकाळच्या वेळी रस्त्यांवर धुके असताना दिसतात ते रिक्षा, आॅटो अन् बसने जाणारे शाळकरी विद्यार्थी. अनेकांच्या डोळ्यावर झोपेची झापडं असतात तर काही जण अक्षरश: कुडकुडत बसले असतात. विद्यार्थ्यांचे हित व आरोग्य लक्षात घेता साधारणत: १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत सकाळच्या शाळांची वेळ दोन तासांनी पुढे करण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.वेळापत्रकात बदल शक्यउपराजधानीतील अनेक शाळा या दोन ‘शिफ्ट’मध्ये भरतात. त्यामुळे सकाळच्या शाळेचा वेळ बदलणे या शाळांना कितपत शक्य होईल, हे सांगता येत नाही. परंतु विद्यार्थ्यांमधील थंडी घालविण्यासाठी आणि त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी शाळांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. थंडीच्या काळात शाळेचे वेळापत्रक बदलून हे करता येणे शक्य आहे. - डॉ. बाबा नंदनपवार, शिक्षण तज्ज्ञ
थंडीत मी शाळेत जाऊ कसा?
By admin | Updated: January 15, 2015 01:02 IST