शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पदवीधर’च्या निवडणूकीसाठी वर्षभराअगोदर भाजपने कसली कंबर

By योगेश पांडे | Updated: September 5, 2025 23:41 IST

मतदार नोंदणी प्रमुखपदाची सुधाकर कोहळेंकडे जबाबदारी : २०२० मधील मतांची वजाबाकी यंदा बेरजेत बदलण्याचे आव्हान

- योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात मागील वेळी पक्षाला मोठा धक्का बसला होता. २०२० च्या निवडणूकीत तोंड पोळल्यावर पक्षाने आता यासंदर्भात ताकदेखील फुंकून पिण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच निवडणूकीला वर्षभराहून अधिकचा कालावधी असतानादेखील पक्षाने त्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

भाजपकडून शुक्रवारी तीन पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रमुखांची घोषणा झाली. त्यात नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी प्रमुखपदी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकेकाळी गणिताचे शिक्षक असलेल्या कोहळेंना मतदार नोंदणीत उतरवून पक्षाकडून मागील वेळची मतांची वजाबाकी बेरजेत बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात २०२० मध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड.अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव केला होता. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. हा मतदारसंघ तयार झाल्यापासून इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार याठिकाणी निवडून गेला नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील एकेकाळी याच मतदारसंघातून विधानपरिषदेत निवडून गेले होते. मात्र २०२० मध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित येत भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. त्यामुळे भाजपकडून यावेळी अगोदरच तयारीवर भर देण्यात येत आहे. वंजारी यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व ६ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. त्याच कालावधीत निवडणूक होईल. या निवडणूकीत पदवीधर मतदारसंघ बांधणे व नवीन मतदारांसोबत जुन्या मतदारांची नोंदणी यावर पूर्ण गणित अवलंबून असते. हीच बाब लक्षात ठेवून भाजपकडून यंदा अगोदरच पावले उचलण्यात येत आहे.

मतदार बांधणे जास्त महत्त्वाचेपदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदारांची नोंदणी मोठी भूमिका पार पाडत असते. ही प्रक्रिया भाजपकडून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठांमध्येदेखील जोर लावण्यात येईल. २०२० च्या निवडणूकीची ॲड.वंजारी यांनी अगोदरपासूनच तयारी सुरू केली होती व त्याचा त्यांना फायदा झाला होता. नागपूर विद्यापीठाच्या वर्तुळात ते सक्रियदेखील होते. माजी आमदार कोहळे यांच्याकडे नागपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. एकेकाळी कोहळे हे शिक्षक होते व पदवीधरमधील संघटन बांधणीची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांचा नियोजन कौशल्याचा कस लागणार आहे

टॅग्स :BJPभाजपा