शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

घरातील नोटा बँकेत

By admin | Updated: November 11, 2016 02:35 IST

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे.

१०० कोटींवर रोख जमा : अनेकांनी केले फिक्स डिपॉझिटनागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे. गुरुवारी बँक सुरू होताच नागरिकांनी बँकेत गर्दी केली. आजवर घरात ठेवलेले पैसे राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँकेसह पतसंस्थांमधील बचत आणि चालू खात्यात जमा केले. अनेकांनी रक्कम फिक्स डिपॉझिट केली. नागरिकांच्या घरात असलेले सुमारे १०० कोटी रुपये आज पहिल्याच दिवशी बँकेत जमा झाले. सर्वाधिक ठेवी सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये जमा झाल्याची माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना दिली. बँका, पंतसंस्थांमध्ये रांगाजोखीम नको म्हणून लोकांनी घरी जमा असलेली रक्कम खात्यात जमा करून सुरक्षित केली. तज्ज्ञांनी सांगितले की, नागपुरात २७ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका आणि सहकारी बँकांच्या जवळपास २५० पेक्षा जास्त आणि पतसंस्थांच्या २५० पेक्षा जास्त शाखा आहेत. या सर्व बँका आणि पतसंस्थांमध्ये ग्राहकांनी रक्कम भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. बंद झालेल्या नोटा बँकेत भरण्यासाठी सर्वजण उत्सुक दिसले. गुरुवारी सर्व शाखांमध्ये भरणा केलेल्या रकमेची आकडेवारी १०० कोटींपेक्षा जास्त आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही पतसंस्थांनी फिक्स डिपॉझिट करण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याची जाहिरातही केली. अपेक्षेनुसार त्यांना प्रतिसादही मिळाला. पुढील तीन दिवसात बँकेत जमा होणाऱ्या पैशाचा हिशेब ३०० कोटींच्या घरात जाईल, असे अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. पोलीस बंदोबस्त, नागरिकांमध्ये वादशहरातील काही बँकांसमोर रांगांमध्ये उभे असलेल्या नागरिकांमध्ये वाद झाले. असे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जेथे जास्त गर्दी दिसत होती, तेथे पोलिसांचे गस्तीपथक थांबत होते. शारदा चौक येथील ‘एचडीएफसी’ बँक, गांधीसागर तलावासमोरील ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’ तसेच लक्ष्मीनगर परिसरातील ‘आयडीबीआय’ बँक यांच्याजवळ पोलीस तैनात होते. नागरिकांना संयम बाळगण्याच्या सूचना पोलिसांकडूनदेखील देण्यात येत होत्या. बँकांसमोर वाहतुकीचा खोळंबादरम्यान, सकाळपासूनच अनेक बँकांमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याने रस्त्याच्या कडेला वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात ‘पार्किंग’ करण्यात आले होते. महाल, इतवारी, सदर, सीताबर्डी इत्यादी ठिकाणी यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते. पैसे संपले गोंधळ उडाला सिव्हील लाईन्स परिसरातील व्हीसीएसमोर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मिड कॉर्पोरेट शाखेत पैसे भरण्यासाठी आणि चलन बदलून घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होती. दोन काऊंटर उघडण्यात आले होते. सकाळपासून सुरळीतच व्यवहार सुरू होता. दुपारी ४.३० वाजता अचानक पैसे संपले आणि एकच गोंधळ उडाला. रांगेत उभे असलेले नागरिक संतप्त झाले. बँकेतील अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर सर्व शांत झाले. नंतर बँकेचे गेट बंद करण्यात आले. जी मंडळी आत होती, त्यांना पैसे जमा करता आले आणि काढला आले. त्यामुळे ४३० नंतर अनेकांना बंद गेट असल्याने परत जावे लागले.