शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

घर देता का घर

By admin | Updated: December 8, 2015 04:01 IST

मुंबईनंतर सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्वात संवेदनशील शहर म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते. राष्ट्रीय घडामोडींचे केंद्रस्थान

पोलीसदादा हक्काच्या निवाऱ्याविना : दोन हजार परिवारांची कुचंबणानरेश डोंगरे ल्ल नागपूरमुंबईनंतर सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्वात संवेदनशील शहर म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते. राष्ट्रीय घडामोडींचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे संघ मुख्यालय, देश-विदेशातील बौद्ध बांधवांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली दीक्षाभूमी, न्यायमंदिर ही आणि अशीच अनेक महत्त्वपूर्ण स्थळे नागपुरात आहेत. अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही येथे राहतात. त्यामुळे येथील महत्त्वपूर्ण स्थळांवर सीआयसीएफसारखी अत्युच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि उपराजधानीत कोणतीही घातपाताची घटना घडू नये यासाठी खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनालाच परिश्रम घ्यावे लागते. त्याचमुळे घातपातासारखी कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून रात्रंदिवस रस्त्यारस्त्यावर ‘पोलीसदादा’ धडपडताना दिसतो. ऊन, वारा, पावसात तो २४ तास आॅनड्युटी असतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत सुविधा सर्वांनाच मिळाव्यात, असा आग्रह असताना समाजाच्या जानमालाची सुरक्षा सांभाळणाऱ्या ‘पोलीसदादा’च्या कुटुंबीयांची निवाऱ्यासाठी परवड होत असल्याचे उपराजधानीतील वास्तव आहे. ३० ते ३५ लाख लोकसंख्येच्या उपराजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी ७,३९९ पोलीस कर्मचारी सांभाळतात. सरकारी नियमानुसार प्रत्येकाला शासकीय निवासस्थान मिळावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, उपराजधानीत पोलिसांची केवळ २८७४ निवासस्थानेच आहेत. त्यातील २०० पेक्षा जास्त निवासस्थाने कंडम (अतिजीर्ण) आहेत. त्यात १३२ निवासस्थाने ‘राखीव’ ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उपराजधानीतील ७,३९९ पैकी २५२४ कर्मचाऱ्यांच्या परिवारांनाच हक्काचे (शासकीय) निवासस्थान मिळालेले आहे. शहरात सर्वात मोठी पोलिसांची वसाहत पोलीस मुख्यालयाजवळ (पोलीस लाईन टाकळी) आहे. येथे १६४६ पोलीस कर्मचाऱ्यांची चांगली निवासस्थाने आहेत. मात्र इतर बहुतांश ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची अवस्था फारच वाईट आहे. ३०-४० वर्षे जुनाट आणि कोंदट, १० बाय १० च्या दोन खोल्यात पोलिसांचे परिवार दिवस काढत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सीताबर्डी, धंतोली, सोनेगाव परिसरातील पोलिसांच्या वसाहतीभोवती घाणीचे साम्राज्य आहे. इमारतींच्या मागच्या-पुढच्या भागात प्रचंड घाण साचली आहे.४एकूण निवासस्थाने - २८७४४जीर्ण निवासस्थाने - २२० ४विविध कारणांमुळे रिक्त - १३२४उपराजधानीत कार्यरत पोलीस कर्मचारी - ७३९९४सध्या निवासस्थानात राहात असलेले परिवार - २५२४४प्रतीक्षा यादीत - २५६ परिवार ४निवासाच्या प्रतीक्षेतील परिवार किमान - २००० (अंदाजे)पोलीस स्टेशननिहाय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने हुडकेश्वर - २४८सीताबर्डी - १३१धंतोली - ०२६इमामवाडा - ०५१गिट्टीखदान - ०१४एमआयडीसी- ०२८सदर- ०५५सक्करदरा - ०४८लकडगंज - ०८५नियंत्रण कक्ष - ०३०पाचपावली - २११तहसील - १५३सोनेगाव - ०१८अजनी -०८२ गणेशपेठ - ०५३मुख्यालय - १६४६