नागपूर : दीपावली म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्व सणांचा राजा. त्यातही दीपावलीतला सर्वाधिक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते तर वस्त्रांपासून दागिन्यांपर्यंतच्या खरेदीला उधाण आले होते. लक्ष्मी अर्थातच समृद्धीचे, शांततेचे आणि शौर्याचे प्रतीक. समृद्धीच्या या देवतेचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला.
घरोघरी आनंदाचे दीपरंग !
By admin | Updated: November 13, 2015 02:33 IST