शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तासाभरात लागला एलएलबीचा निकाल

By admin | Updated: July 26, 2014 02:54 IST

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७२ अनुसार ४५ दिवसांत

हायकोर्टात विद्यापीठाची ग्वाही : विद्यार्थ्यांना दिलासानागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७२ अनुसार ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे आवश्यक असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एलएलबी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल ८२ दिवस लोटूनही लावला नव्हता. विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतल्यामुळे विद्यापीठाने शुक्रवारी निकाल जाहीर करण्याची ग्वाही दिली. यानंतर तासाभरात निकालही जाहीर करण्यात आला. तासाभरात निकाल जाहीर करणे शक्य असताना विद्यार्थ्यांना वारंवार वेठीस का धरल्या जाते असा प्रश्न याप्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा गेल्या ३ मे रोजी संपली. यानंतर नियमानुसार १७ जूनपर्यंत निकाल घोषित होणे अपेक्षित होते. परंतु, विद्यापीठाची आज सायंकाळपर्यंत निकाल घोषित करण्याची काहीच तयारी नव्हती. संबंधित याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर विद्यापीठाने आज, सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे वक्तव्य केले. त्यानुसार निकालही जाहीर करण्यात आला. नॅशनल लॉ स्कूलतर्फे एलएलएम अभ्यासक्रमाकरिता राष्ट्रीयस्तरावर प्रवेश परीक्षा घेण्यात येते. याशिवाय बार कौन्सिल आॅफ इंडियाने वकिली व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एआयबीई (आॅल इंडिया बार एक्झॅम) पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. ही परीक्षा ९ सप्टेंबर रोजी होणार असून प्रवेश नोंदणीची अखेरची तारीख २७ जुलै होती. विद्यापीठाने पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या दहाव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर केला, पण तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल रखडला होता. परिणामी विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांना बसण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून सहाव्या सेमिस्टरचा निकाल लवकर जाहीर करण्याची व एआयबीई पात्रता परीक्षा प्रवेश नोंदणीची अखरेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर सायंकाळी ५ वाजतापर्यंत निकाल जाहीर करण्याचे वक्तव्य विद्यापीठातर्फे करण्यात आले. तसेच, बार कौन्सिलतर्फे अ‍ॅड. कैलाश नरवाडे यांनी एआयबीई पात्रता परीक्षेच्या प्रवेश नोंदणीची अखेरची तारीख १३ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. दोन्ही विनंत्या पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाने याचिका निकाली काढली.