शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल्स त्वरित सुरू करा : रेल्वे बोर्डाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:16 IST

रेल्वे बोर्डाच्या वतीने राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी रेल्वेस्थानकावरील सर्व हॉटेल्स, स्टॉल्स सुरू करावेत, असा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे.

ठळक मुद्दे रेल्वे प्रशासनाने दिले हॉटेल, स्टॉल धारकांना पत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाच्या वतीने राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी रेल्वेस्थानकावरील सर्व हॉटेल्स, स्टॉल्स सुरू करावेत, असा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल धारकांना पत्र देऊन आपली दुकाने त्वरित सुरू करण्यास सांगितले आहे.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी रेल्वे बोर्डाने लांब पल्ल्याच्या राजधानी स्पेशल रेल्वेगाड्यांची वाहतुक १२ मेपासून सुरू केली आहे. परंतु प्रवासात अनेक प्रवाशांना भूक लागत आहे. रेल्वेस्थानकावरील हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद असल्यामुळे त्यांचा नाईलाज होत आहे. अनेक प्रवाशांना उपाशीपोटी प्रवास करावा लागत आहे. ही गंभीर बाब रेल्वे बोर्डाच्या लक्षात आली. त्यामुळे याची दखल घेऊन रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय कार्यालयांना रेल्वेस्थानकावरील हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स त्वरित सुरू करण्याबाबत पत्र दिले आहे. बुधवारी नागपूरच्या ‘डीआरएम’ कार्यालयात या बाबतचा आदेश धडकला. त्यानुसार गुरुवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर विभागातील रेल्वेस्थानकावरील सर्व हॉटेल, स्टॉल धारकांना पत्र देण्यात आले. पत्रात रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल्स त्वरित सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राजधानी स्पेशल रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार दिले पत्र‘रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल्स सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाचा आदेश मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळाला. त्यानुसार अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यानंतर सर्व हॉटेल्स, स्टॉलच्या संचालकांना पत्र देण्यात आले आहे. लवकरच रेल्वेस्थानकावरील हॉटेल, स्टॉल सुरू होऊन प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध होतील.’

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरhotelहॉटेल