शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा वापर करावा : देवेंद्र महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:42 IST

हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा मर्यादित वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटी अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे (एनएसएससीडीसीएल) महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन यांनी येथे केले.

ठळक मुद्दे‘एनआरएचए’तर्फे प्रशिक्षण कार्यशाळा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा मर्यादित वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटी अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे (एनएसएससीडीसीएल) महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन यांनी येथे केले.नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनचे (एनआरएचए) सदस्य आणि कर्मचाऱ्यांसाठी फायर मार्शल प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सभेचे आयोजन करण्यात आले. मंचावर मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, एनआरएचएचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, माजी अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी, उपाध्यक्ष इंदरजित सिंग बावेजा, सचिव दीपक खुराणा आणि कोषाध्यक्ष विनोद जोशी उपलब्ध होते.रेणू म्हणाले, आग लागण्याची घटना ही एक दुर्घटना आहे. प्रशिक्षण कार्यशाळेत आग विझविणे आणि अन्य उपकरणांचा प्रभावी उपयोग करणे आणि स्थिती आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.राजेंद्र उचके यांनी या प्रशिक्षणासाठी मनपाशी संपर्क साधण्यासाठी एनआरएचएची प्रशंसा केली. हे प्रशिक्षण कायद्यानुसार आवश्यक आहे. आमची चमू नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्याकरिता नाममात्र खर्च येतो. त्याचे वहन एनआरएचएने करावे. बॅचेसमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येकाला अग्निसुरक्षा उपकरणे हाताळण्याची संधी प्राप्त होणार आहे.बैठकीत एनआरएचएच्या सदस्यांमध्ये गोविंद मुदलीयार, अजय जयस्वाल, संजय अग्रवाल, तरुण मोटवानी, अफजल मीठा, वासुदेव त्रिवेदी, महेश त्रिवेदी, रिषी तुली, मोहम्मद अनिस ओपई, नागेश वझलवार, विजय सावरकर, अमित रघटाटे, शारीक हफीज, शिवम गुप्ता, सुद् वैद्य, मनोज शुल्का, तुषार खुराणा, चंद्रकांत चौरसिया, अर्जुन बुंदीवाल, राजेंद्र हुडा, श्यामशंकर मिश्रा, मधुसुदन त्रिवेदी, मनोज अवचट, विशाल जयस्वाल, नवीन केवलरमानी व धनराज मेश्राम उपस्थित होते. संचालन व आभार एनआरएचएचे सचिव दीपक खुराणा यांनी मानले.

टॅग्स :hotelहॉटेलelectricityवीज