शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच-उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : १२९ निवडून आलेले सदस्य : १,१७४ सरपंच : १२२ अभय लांजेवार उमरेड : नागपूर ...

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : १२९

निवडून आलेले सदस्य : १,१७४

सरपंच : १२२

अभय लांजेवार

उमरेड : नागपूर जिल्ह्यात जानेवारीत १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. तीत विविध वॉर्डातून ११७४ सदस्य विजयी झाले. ११ फेब्रुवारीला अटीतटीच्या राजकारणात सरपंच-उपसरपंचसुद्धा विराजमान झालेत. आता सरपंच-उपसरपंचांना मानधन मिळणेही सुरू होईल. असे असताना जुन्याच नियमावलीचा आधार घेत ग्रामपंचायत सदस्यांना मात्र केवळ बैठक भत्ता आणि चहापानावरच समाधान मानावे लागणार आहे. आम्हीसुद्धा त्याच निवडणूक प्रक्रियेतून विजयी होतो आणि जनतेचेच प्रतिनिधी म्हणून काम करतो. असे असताना आमच्यावर ‘मानधन’स्वरूपातील अन्याय कोणत्या कारणाने, असा सवाल ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत अतिशय बळकट असलेल्या आणि ‘ग्रामविकासाचा आरसा’ मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांना मानधन मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्तीची सोय करणे, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, शिक्षण, आरोग्य आदी असंख्य बाबींवर ग्रामपंचायतीचे सदस्य महत्त्वाची भूमिका वठवित असतात. त्यांच्या माध्यमातूनच सरपंच-उपसरपंच यांच्यापर्यंत ग्रामविकासाचे धोरण यथोचित पोहोचत असते. अशावेळी मानधनासाठी सदस्यांना दुर्लक्षित करणे अन्यायकारकच असल्याच्या भावना ग्रामपंचायत सदस्यांच्या आहेत. शासनाने या मुद्याबाबत विचारमंथन करून तातडीने मानधन सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

सरपंच काय म्हणतात...

ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामपंचायतीचा कणा आहेत. विकासकामे, बारीक सारीक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सदस्य आटापिटा करतात. खऱ्या अर्थाने त्यांनाही मानधन मिळावे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने तसा ठराव पाठविण्यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे.

ममता हाडके

सरपंच, शिरपूर

--

ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांचाही वाटा मोलाचा असतो. तेव्हा आमच्यासह त्यांनासुद्धा मानधन मिळायलाच पाहिजे.

सुनीता लांबट, सरपंच

बोरगाव लांबट

--

गावखेड्यातील प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य हा सोबत असतो. यामुळे त्यांना मानधन मिळणे अत्यावश्यक आहे. हा निर्णय होणे गरजेचे आहे.

गजानन शेंडे(सरपंच)

सावंगी खुर्द

मानधन ३००० ते ५०००

लोकसंख्यानिहायसरपंच मानधन उपसरपंच मानधन

ग्रामपंचायती

० ते २००० ३००० रु. १००० रु.

२००१ ते ८००० ४००० रु. १५०० रु.

८ हजाराहून जास्त ५००० रु. २००० रु.

निवडून आलेल्या सदस्यांना २०० ते ३०० रुपये बैठक भत्ता आणि चहापाणी एवढ्यावरच समाधान मानावे लागते.