शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

संपाच्या नावावर रुग्णांना दाखविला घरचा रस्ता

By admin | Updated: September 3, 2016 01:10 IST

देशव्यापी संपाचा सर्वाधिक फटका शुक्रवारी प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना बसला.

प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रकार : मनोरुग्णांना नाश्ता, जेवण मिळण्यासही उशीरनागपूर : देशव्यापी संपाचा सर्वाधिक फटका शुक्रवारी प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना बसला. येथील परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर गेल्याने मनोरुग्णांना सकाळचा नाश्ता तीन तास उशिरा मिळाला. यामुळे चिडलेल्या वॉर्ड क्र. १५ च्या रुग्णांनी दरवाजा तोडला. धक्कादायक म्हणजे, रुग्णालय प्रशासनाने संपाचे नियोजन केले नव्हते. परिणामी, बाह्यरुग्ण विभागात एकही रुग्णाला तपासण्यात आले नाही. बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांनाही खाली हात परतावे लागले.राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संपात प्रादेशिक मनोरुग्णालयातील १५०वर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व ६०वर परिचारिका संपावर गेल्या. सूत्रानुसार, एक दिवसाआधी चतुर्थ श्रेण कर्मचाऱ्यांनी संपावर जात असल्याचे पत्र दिले होते, परंतु परिचारिकांनी विना पत्र देताच संपावर गेल्या. यामुळे मनोरुग्णांना आज बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. रुग्णालयातील वॉर्डातील दारे सकाळी ७ वाजता उघडून ७.३० वाजता रुग्णांना नाश्ता देण्याचा नियम आहे. परंतु शुक्रवारी सकाळी ९ वाजले तरी वॉर्डातील दरवाजे उघडले नव्हते. यामुळे चिडलेल्या वॉर्ड १५ मधील रुग्णांनी दरवाजाच तोडला. याची माहिती काही वरिष्ठ डॉक्टरांना मिळाल्यावर त्यांनी स्वच्छता सेवा कर्मचारी, सुरक्षा रक्षक व सुमारे १० परिचारिका ज्या संपावर गेल्या नव्हत्या यांच्या मदतीने १०.३० वाजता नाश्ता दिला. दुपारच्या जेवणातही उशीर झाला. कर्मचारी संपावर गेल्याने बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांचे नोंदणी पत्र तयार करणारी खिडकीही बंद होती. डॉक्टर होते पण त्यांच्या मदतीसाठी कोणीच नव्हते. यामुळे आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना संपाची माहिती देऊन विनाउपचार खाली हात पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)