शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

By admin | Updated: September 10, 2015 03:46 IST

गेली दोन दिवस विदर्भातील निवडक सिंचन प्रकल्पाच्या पाहणीत विधिमंडळाच्या अंदाज समितीला काही धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत.

अंदाज समितीने अनुभवले तुरागोंदीतील वास्तव : अडीच कोटी मातीकामावर खर्चनागपूर : गेली दोन दिवस विदर्भातील निवडक सिंचन प्रकल्पाच्या पाहणीत विधिमंडळाच्या अंदाज समितीला काही धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत. याशिवाय प्रकल्पग्रस्त शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनीही अनेक बाबी समितीच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. समितीने हे सर्व गांभीर्याने घेत विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रकल्पांविषयी स्पष्टीकरण मागत माहिती असेल तरच बोला, स्पष्टीकरण खोटे आढळले तर कारवाई केली जाईल, असे समितीने अधिकाऱ्यांना सुनावले. यामुळे उडवाउडवीची उत्तरे देण्याच्या तयारीत असलेले अधिकारी सुन्न झाले. शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील तुरागोंदी या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पावर १२ कोटी रुपये खर्च झाले असून पायव्यात काळी माती भरण्यावर अडीच कोटी रुपये खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी समितीला सांगितले. यावर समितीच्या बहुतांश सदस्यांचे समाधान झाले नाही. आजूबाजूला काळी माती उपलब्ध नाही. मग एवढी काळी माती कुठून आणली, खरोखरच ११ मीटर खोल काळी मातीचे भरण केले आहे का, हे आता कसे तपासता येईल, असे प्रश्न बऱ्याच सदस्यांनी उपस्थित केले. प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन समिती दुपारी नागपुरात परतली. समितीने दोन दिवसाच्या दौऱ्यात कार, सत्रापूर, बावनथडी व तुरागोंदी या प्रकल्पांची पाहणी केली. बुधवारी तुरागोंदी प्रकल्पाच्या पाहणीनंतर समितीने विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. तीत नागपूर व भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी तसेच सिंचन विभागातील अधिकारी उपस्थित होते. समितीने चारही प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात आढळून आलेल्या त्रुटी व नागरिकांनी दिलेल्या तकर्रारींच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण मागविले व त्यांचे मत मांडण्यास प्रत्येकाला संधी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण नोंदवून घेण्यात आले. समितीचे सदस्य आ. मदन येरावार, अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, चरण वाघमारे, बाळासाहेब मुरकुटे, डॉ. शशिकांत खेडेकर, विरेंद्र जगताप हे पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)