शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ...

ठळक मुद्दे विदर्भ राज्य आंदोलन समिती : विदर्भात ५० ठिकाणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भात ५० ठिकाणी या नागपूर कराराची होळी करून या दिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केळकर समितीच्या अहवालाची होळी करून त्यांचाही निषेध करण्यात आला.नागपूर करारानुसार २३ टक्के विदर्भातील तरुणांना रोजगार देण्याचे मान्य केल्यावरही फक्त ८ टक्केच नोकºया दिल्या म्हणून विदर्भातील ४ लाख तरुणांचा रोजगार हिरावून येथील बेरोजगारांवर अन्याय केला. सिंचन व रस्त्यांचे एकूण १.५० लाख कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पळविले म्हणून विदर्भात धरणे रखडली. गावागावातील व शेतकºयांच्या शेतापर्यंतचे रस्ते थांबले. या सर्व प्रकारामुळे विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ५० वर्षे विकासामध्ये मागे पडला, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शहर समितीतर्फे दुपारी संविधान चौकात नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी केली. यावेळी विदर्र्भाच्या घोषणाही देण्यात आल्या तसेच भाजपा सरकार विरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुख्य निमंत्रक राम नेवले, शहर अध्यक्ष राजकुमार नागुलवार, अरुण केदार, विजया धोटे, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, धनंजय धार्मिक, महेंद्र भांगे, रवी घाडगे पाटील, नरेंद्र दौडकर, नीरज खांदेवाले, डॉ. पुरुषोत्तम भोंडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मिशन विदर्भतर्फेसुद्धा संविधान चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आलीज्येष्ठ विदर्भवादी उमेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, नितीन रोंघे, अनिल तिडके, विष्णू आष्टीकर, रवी गाडगे पाटील, तन्हा नागपुरी, अ‍ॅड. अविनाश काळे, दिलीप नरवडिया, सुनील खंडेलवाल, महेश मामीडवार, रामचंद्र देशमुख, नरेश निमजे, निखील भुते, अश्वजित पाटील, हिरासिंग ठाकूर, डॉ. शालिगाम चरडे, चंदू मोखारे, मनोज मालवी, अलीम खान, प्रभाकर बोरकर, सर्जेराव बाजीराव गलपट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.येथेही झाले आंदोलननागपूरसह चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, कोरपना, सावली, नागभीड, वरोरा, भद्रावती, चिमूर, यवतमाळमध्ये यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, वर्धा-समुद्रपूर, हिंगणघाट, सिंदी रेल्वे, पुलगाव, अमरवाती-परतवाडा, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, वरुड, अंजनगाव, बुलडाणा-चिखली, मेहकर, मलकापूर, खामगाव, नागपूर- काटोल, नरखेड, उमरेड, भिवापूर, गडचिरोली-गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, वडसा, सिरोंचा, अहेरी, भंडारा-गोंदिया, अकोला, वाशिम आदींसह ५० ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.