शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.वेदप्रकाश मिश्रांची दणक्यापूर्वीच शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती.

ठळक मुद्देपदविका केली वापस : विद्यापीठ म्हणते, पदविका परत घेण्याची तरतूदच नाही, आम्हीच कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती. दुसरीकडे विद्यापीठाने मात्र डॉ.मिश्रा यांना अशाप्रकारे पदवी परत करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा केला आहे. नियमांत अशी तरतूद नसून विद्यापीठ पदविका काढून घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती हे सांगणाऱ्या चौकशी अहवालाला १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने मान्यदेखील केले.हे प्रकरण परत एकदा समोर आल्यानंतर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे डॉ.मिश्रा यांनी दिवाणी न्यायालयात जुनी याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ.मिश्रा यांना १७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र आता ही मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांना स्वत: उपस्थित राहावे लागणार आहे. जर ते उपस्थित झाले नाही, तर त्याच दिवशी निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर डॉ.मिश्रा यांनी बुधवारी कुलगुरूंना एका व्यक्तीच्या माध्यमातून पत्र पाठविले. ही पदविका आपण परत करत असल्याचे यात नमूद करण्यात आले. आपण पदविका प्रमाणपत्र विद्यापीठातून घेतले नसल्याचेदेखील त्यांनी यात नमूद केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठliteratureसाहित्य