शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची धडक आत्या ठार, भाचा गंभीर

By दयानंद पाईकराव | Updated: April 13, 2024 20:04 IST

दरम्यान अमरावती रोडवर वडधामना चौक येथे अज्ञात ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या अ‍ॅक्टीव्हाला जोरात धडक दिली.

नागपूर : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील आत्या ठार झाली. तर भाचा गंभीर जखमी झाला. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १२ एप्रिलला रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

कुसुम पारागु कटोते (५३, रा. बक्षी ले आऊट, अमरावती रोड) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर साहिल सुरेश शंभरकर (२६, रा. रघुपतीनगर वाडी) असे गंभीर जखमी झालेल्या भाच्याचे नाव आहे. साहिल आपली आत्या कुसुम यांना अ‍ॅक्टीव्हावर बसवून त्यांच्या घरी सोडून देण्यासाठी निघाला. दरम्यान अमरावती रोडवर वडधामना चौक येथे अज्ञात ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या अ‍ॅक्टीव्हाला जोरात धडक दिली.

या दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी कुसुम यांना तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमी असलेल्या साहिलवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी फिर्यादी सुजाता केतन सुखदेवे (४७, रा. बक्षी ले आऊट, अमरावती रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.