शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याला सात वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: February 23, 2017 02:03 IST

मामीची चाकू भोसकून हत्या व मामाला गंभीर जखमी करणाऱ्या भाचाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्ट : मामीची चाकू भोसकून हत्या नागपूर : मामीची चाकू भोसकून हत्या व मामाला गंभीर जखमी करणाऱ्या भाचाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेप रद्द करून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. प्रमोद उर्फ भुऱ्या गंगाराम गजभिये (३०) असे आरोपीचे नाव असून तो झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आहे. मृताचे नाव छाया पाटील होते. एक दिवस आरोपी व त्याच्या भावाचे भांडण झाले होते. आरोपीचा मामा रामराव व मामी छायाने मध्यस्थी करून भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. परिणामी आरोपीने त्यांच्यासोबतही भांडण केले. त्याने मामा-मामीविषयी मनात राग धरून ठेवला होता. त्यातून २० जून २०१३ रोजी आरोपीने पुन्हा रामराव व छायासोबत भांडण केले. दरम्यान, आरोपीने दोघांवरही चाकूने वार केले. रामराव वार वाचविण्यात यशस्वी ठरला, पण छाया स्वत:ला वाचवू शकली नाही. आरोपीने तिची हत्या केली. सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. आरोपीला भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-१ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अन्य शिक्षा कायम ठेवली. गिट्टीखदान पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)