शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणा पोलीस ठाणे झाले ‘आयएसओ’

By admin | Updated: May 16, 2017 02:21 IST

कार्यकुशलता व सुव्यवस्थेमुळे हिंगणा पोलीस ठाण्याला ‘आएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे.

अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव : आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे कर्मचाऱ्यांत उत्साहलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : कार्यकुशलता व सुव्यवस्थेमुळे हिंगणा पोलीस ठाण्याला ‘आएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाणपत्र प्रदान करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते हिंगणा पोलिसांचा सोमवारी गौरव करण्यात आला. पोलीस ठाण्याला सदर मानांकन मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.या कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त एस. दिघावकर, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील, आएसओ आॅडिटर नितीन पोहाणे, तहसीलदार प्रताप वाघमारे, पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, वाडीचे सतीश जाधव, सोनेगाव ठाण्याचे संजय पांडे, प्रतापनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड उपस्थित होते.प्रत्येकाने करीत असलेल्या कार्यामध्ये समाधान मिळेल, अशी विभागणी करण्यात यावी, स्मार्ट पोलीस संकल्पना सर्व मिळून पुढे नेऊ, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त दिघावकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी ग्रामीण भागातील शहर पोलीस दलातील पहिले आयएसओ पोलीस ठाणे म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी हिंगणा पोलिसांच्यावतीने उपायुक्त दीपाली मासिरकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी स्मार्ट पोलीस संकल्पनेला साकार करण्यासाठी शहरातील पोलीस ठाणे प्रयत्नरत असल्याचे सांगितले. हिंगणा भागात पोलीस वाहनांची गरज असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार हेमंत खराबे यांनी केले. संचालन भारती दवने यांनी केले. आभार एपीआय मोरेश्वर बारापात्रे यांनी मानले. कार्यक्रमाला हिंगणा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते.