हिंदी दिवस : लोकमत समाचारच्यावतीने वरिष्ठ साहित्यिकांचा सत्कारनागपूर : हिंदी दिवसाच्या पूर्वसंध्येला शनिवारी ‘लोकमत समाचार’च्यावतीने लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत हिंदी साहित्यकारांशी चर्चा व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यंग लेखक प्रा. मधुप पांडे, इतिहासकार व साहित्यकार डॉ. शरफुद्दीन साहिल, आयुर्वेद चिकित्सक व कवि डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय, प्रसिद्ध कवि व न्यूरो सर्जन डॉ. लोकेंद्र सिंह व विनोदी व्यंग कवि डॉ. राजेंद्र पटोरिया उपस्थित होते. त्यांनी हे विचार मांडले. हिंदी भाषेचे मूळ मजबूत करण्यासाठी लोकमत समाचारच्या या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.हिंदीला प्रवाहित होऊ द्याप्रा. मधुप पांडे म्हणाले, हिंदी भाषेतील नवीन शब्द आणि न कळणाऱ्या शब्दांमुळे निराश होण्याची गरज नाही. यात येणाऱ्या विविध भाषेतील शब्द मग ते उर्दू, इंग्रजी, तामिळ कुठलेही असो उत्साहाने त्याचे स्वागत करण्याची गरज अहे. ग्रामीणमध्येही हिंदीचे वर्चस्वडॉ. लोकेन्द्र सिंह म्हणाले, माझ्याकडे ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. ते उत्साहाने हिंदीत बोलतात. त्यांच्याकडून हिंदीचे अनेक नवे शब्द शिकायला मिळतात. हिंदी भाषा त्यांच्या अंगवळणी पडली आहे. फक्त २० ते २५ टक्के नागरिकच इंग्रजी भाषेचा वापर करतात. हिंदी आजही सर्वाधिक प्रभावशाली भाषा आहे. संस्कृती वाचविण्यासाठी भाषेचे रक्षण गरजेचेडॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय म्हणाले, भाषेचा द्वेष करून आपण आपल्या संस्कृतीचे नुकसान करतो. हिंदीच नव्हे तर भारतातील भाषांचे रक्षण करण्याची गरज आहे. हिंदी मैत्रीची भाषाडॉ. शरफुद्दीन साहिल म्हणाले, हिंदी भाषा ही मैत्री, प्रेम, बंधूभावाची भाषा आहे. ती नष्ट होऊ शकणार नाही.भाषेचा कुठलाच धर्म नसतो. हिंदीला देवनगरी भाषेत लिहिल्यास ती हिंदी होते. या भाषेत नवीन शब्दांचा वापर बंद करू नये. वृत्तपत्रात हिंदीच्या कठीण भाषेचा वापर व्हायला नको. हिंदी आणि उर्दू भारताच्या दोन मुली आहेतदेशाच्या कानाकोपऱ्यात हिंदी लोकप्रियडॉ. राजेंद्र पटोरिया म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात विविध भाषा बोलल्या जातात. परंतु देशाच्या उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व ते पश्चिम भागात हिंदी लोकप्रिय आहे. नागपूर आणि विदर्भात हिंदीच्या प्रचार आणि प्रसारासाठी लोकमत समाचाराचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, स्थानिक संपादक हर्षवर्धन आर्य, प्रोडक्ट हेड मतीन खान, प्रसार उपमहाव्यवस्थापक संतोष चिपडा, लोकमत समूहाचे उपाध्यक्ष (वित्त) संजय खरे यांनी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. प्रास्ताविक संपादक मिश्र यांनी तर संचालन प्रोडक्ट हेड मतीन खान यांनी केले. (प्रतिनिधी)
हिंदी मैत्री, प्रेम, बंधूभावाची भाषा
By admin | Updated: September 15, 2014 01:01 IST