५८ वा महापरिनिर्वाणदिन : विविध संस्था, संघटनांकडून वाहिली आदरांजलीनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी विविध संस्था, संघटनांनी आदरांजली वाहिली. संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांनी मानवंदना दिली.अखिल भारतीय धम्म सेनाअखिल भारतीय धम्म सेना भिक्षु-भिक्षुणी महासंघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी भंते ताकायामा (जपान), भंते नागघोष, भंते नागसेन, भंते नागाप्रकाश, भंते नागधम्म, भंते धम्मविजय, भंते धम्मानंद आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीभारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ.प्रा. अनिल सोले, आ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे व मोर्चाचे शहाराध्यक्ष धर्मपाल मेश्राम उपस्थित होते. रिपब्लिकन मुव्हमेंट रिपब्लिकन मुव्हमेंटच्यावतीने बबनराव बोंदाटे व नरेश वाहणे यांच्या नेतृत्वात बाबासाहेबांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवचरण थूल, अमन सोनटक्के, एन.एल. नाईक, विजय मोरे आदी उपस्थित होते.आयकर विभागआयकर विभागाच्यावतीने चाणक्य सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त सतीश गोयल उपस्थित होते. त्यांनी यावेळी बाबासाहेबांच्या विचारांना आचरणात आणण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक अण्णा मेश्राम यांनी केले. संचालन किशोर शेंडे यांनी केले तर आभार यशवंत वालदे यांनी मानले. यावेळी संयुक्त आयकर आयुक्त आकाश देवांगन उपस्थित होते.तथागत बहुउद्देशीय संस्थालाँग मार्च चौक येथे तथागत बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सुनील जवादे, मनीष ढेंगरे, धम्मा धाबर्डे, सुभम ढेंगरे, तुषार ढेंगरे आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदजिल्हा परिषदेतील आबासाहेब खेडकर सभागृहात परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बाबाराव वाणी, डॉ. योगेंद्र सवाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षसंविधान चौकात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष शेषराव गणवीर यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष सचिन वालदे, सुनीता नितनवरे उपस्थित होते.डॉ. आंबेडकर अकादमीअकादमीचे अध्यक्ष मिलिंद खैरकर यांच्या हस्ते संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नाटककार अमर रामटेके, अॅड. सुरेश घाटे, अरविंद चिंचखेडे, अशोक गायकवाड, चंदू बागडे, चंदू नाईक, अरुण अलोणे, कविता खैरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महामानवास अभिवादन
By admin | Updated: December 7, 2014 00:26 IST