शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक

By admin | Updated: December 31, 2016 02:59 IST

न्याय व विधी क्षेत्रासाठी दोन वर्षांत ११०० कोटी रुपयांची तरतूद केली. महाराष्ट्र हे न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करणारे देशात पहिले राज्य आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन नागपूर : न्याय व विधी क्षेत्रासाठी दोन वर्षांत ११०० कोटी रुपयांची तरतूद केली. महाराष्ट्र हे न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करणारे देशात पहिले राज्य आहे. ही तरतूद न्यायालय इमारती आणि न्यायाधीशांच्या निवासासाठी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे येथे सांगितले. जिल्हा वकील संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा न्यायालय नागपूरच्या विस्तारित नवीन ईमारतीचे भूमीपूजन सोहळयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी , मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला, राज्याचे महाधिवक्ता रोहित देव आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या नवीन इमारतीला अद्ययावत पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच पार्किंगची समस्या सोडवण्यात येईल, केंद्र सरकारच्या मदतीने बहुमजली पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, सुयोग इमारतीचा विकास केला जाईल, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या बार रूमसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या बंगल्याच्या परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयासाठीही परिक्षेत्र महानिरीक्षकाच्या कार्यालयासमोरील जागा देण्यात आलेली आहे. अकोला, अमरावती या ठिकाणच्या न्यायालयीन इमारतीचे बांधकामही ३-४ महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. नाशिक येथे न्यायालय इमारतीचा प्रश्नही सोडवण्यात आला असून न्यायालयासाठी अडीच एकर जागा देण्यात आलेली आहे. मुंबईच्या बांद्रा येथे उच्च न्यायालयाची अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवीन न्यायालयाच्या इमारतीचे स्थापत्य व उपयोगिता सुंदर रितीने घडविण्यात याव्यात. या इमारतीमध्ये सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी स्थापित करून न्यायदानाच्या या कार्यसंस्कृतीमध्ये जास्तीत जास्त माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना करून ही नवीन इमारत विक्रमी वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)