शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गावरून हायकोर्टाचा भडका

By admin | Updated: February 5, 2015 01:04 IST

वन विभागाने मनसर-खवासा मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तीन लांबलचक भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे ठेवल्यामुळे हायकोर्टाचा भडका उडाला.

वन विभागाला खडसावले : वास्तविकता समजण्याची सूचनानागपूर : वन विभागाने मनसर-खवासा मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तीन लांबलचक भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे ठेवल्यामुळे हायकोर्टाचा भडका उडाला. वास्तविक परिस्थितीला गाठोड्यात गुंडाळून वागत असलेल्या वन विभागाला हायकोर्टाने पुन्हा एकदा कडक शब्दात फटकारले. केंद्र शासनाने मनसर-खवासा मार्गाच्या चौपदरीकरणाला कोणत्या शर्तीवर परवानगी द्यायची, हे निश्चित करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित केली आहे. समितीने या मार्गावर नऊ भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवून एकूण खर्च ३३४ कोटींपर्यंत कमी केला आहे. यापूर्वी मनसर ते खवासापर्यंत उड्डाणपूल बांधण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर ७५० कोटी रुपये खर्च येणार होता. नवीन प्रस्तावात दोन भुयारी मार्ग १००० मीटरचे, तर एक भुयारी मार्ग ३०० मीटरचा आहे. हे प्रकरण बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आल्यानंतर, महामार्ग प्राधिकरणाने या तीन भुयारी मार्गावर आक्षेप घेतला. या भुयारी मार्गांवर २०० कोटी रुपयांवर खर्च येईल, असे सांगितले. न्यायालयानेही ही बाब मान्य करून वन विभागाची खरडपट्टी काढली. वन्यप्राण्यांना जाण्या-येण्यासाठी एवढ्या लांबलचक भुयारी मार्गाची आवश्यकताच काय आहे. याकरिता १०० मीटरचा भुयारी मार्गही पुरेसा ठरू शकतो. या मार्गाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रवास करीत आहे. यादरम्यान भरधाव वाहनामुळे वन्यप्राण्यांचा अपघात झाल्याचे ऐकीवात नाही. यासंदर्भात कुठे बातम्याही प्रकाशित झालेल्या नाहीत. वन विभागाकडे याविषयीची आकडेवारी असल्यास पटलावर सादर करावी, असे न्यायालयाने नमूद करून वन विभागाला दोन आठवड्यांत वास्तविकतेला अनुसरून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.वन विभागाची परवानगी नसल्यामुळे मनसर-खवासा रोडचे चौपदरीकरण रखडले आहे. न्यायालयाने यासंदर्भात स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, तर प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. ए. एम. घारे व अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)