शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

फ्लॅटमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

By admin | Updated: August 11, 2016 02:05 IST

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कोराडीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला देह व्यापाराच्या ‘हाय प्रोफाईल’ अड्ड्यावर धाड टाकली.

दोन आरोपींना अटक : दिल्ली-मुंबईतील युवती सापडल्या नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कोराडीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला देह व्यापाराच्या ‘हाय प्रोफाईल’ अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांनी या अड्ड्यावरून दिल्ली-मुंबईतील युवतींना पकडले आहे. इंटरनेटवर ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावाने हा व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी हा अड्डा चालविणारी मुख्य आरोपी निशा ऊर्फ पूजा प्रीतम दहिकर (२८) रा. इंदोरा झोपडपट्टी आणि तिचा साथीदार मंत शामलाल टेंगुरिया (२९) रा. इंदोर मध्यप्रदेश यास अटक केली आहे. निशा दहिकर पूजा आणि सीमासह अनेक नावांनी देह व्यापारात ओळखल्या जाते. ती ‘नागपूर एस्कॉर्ट सर्व्हिस’ नावाने आॅनलाईन सेक्स रॅकेट चालवित होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून संपर्क साधला. निशाने आपले नाव माया सांगितले. तिने ग्राहकाला मानकापूरच्या आयकॉन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०२ येथे बोलविले. पोलिसांनी बनावट ग्राहकाला तेथे पाठविले. निशाने दोन हजारात युवतीचा सौदा करून पैसे घेताच पोलिसांनी धाड टाकून तिला मंत टेंगुरियासह अटक केली. फ्लॅटमध्ये दोन युवती आढळल्या. यातील एक दिल्लीची तर दुसरी मुंबईची रहिवासी आहे. दोघीही अनेक दिवसांपासून देह व्यापारात गुंतल्या आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कामाचे कारण सांगून येथे बोलविल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईची युवती मंगळवारी तर दिल्लीची युवती आजच येथे आली. मुंबईची युवती हैदराबाद येथील काम संपल्यानंतर येथे आली. दोघीही एक, दोन आठवड्यासाठी एखाद्या शहरात जातात. त्यांच्याजवळ दलालांचे नेटवर्क आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना वर्षभर काम मिळते. देहव्यापारात मोठी कमाई होत असल्यामुळे दोघीही विमानाने प्रवास करतात. निशा अनेक दिवसांपासून देह व्यापारात आहे. दीड वर्षापुर्वी तिच्या पतीला देह व्यापारात अटक झाली होती. सध्या तो आॅटो चालवितो. देह व्यापाराचा अनुभव असल्यामुळे निशाने युवतींना येथे बोलविले. मंत हा ‘मेक अप’ करण्याचे काम करतो. निशाजवळ ग्राहकांची संख्या मोठी आहे. तपासात तिच्यापासून अनेक महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलीस फ्लॅट मालकाचाही शोध घेत आहेत. ही कारवाई अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. सी. सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक जयपूरकर, उपनिरीक्षक इंगोले, गोपाळ वैद्य, योगेश घोडकी, मनोज सिंह चव्हाण, अजय घाटोळे, संजय पांडे, सुरेखा सांडेकर, साधना चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)