शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : सरकारला २५ हजार रुपये दावा खर्च बसवण्याची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:19 IST

High Court, State Government मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका भूसंपादन प्रकरणामध्ये राज्य सरकारला २५ हजार रुपये दावा खर्च बसवण्याची तंबी दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देउत्तर सादर करण्यात दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका भूसंपादन प्रकरणामध्ये राज्य सरकारला २५ हजार रुपये दावा खर्च बसवण्याची तंबी दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.भंडाऱ्यातील महावीर भालगट यांनी त्यांची मौजा बेला येथील संपादित जमीन परत मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या जमिनीचा ५ जुलै २०११ रोजी अवॉर्ड जारी करण्यात आला आहे. परंतु, भालगट यांनी अवॉर्डची रक्कम स्वीकारली नाही. जमिनीचा ताबा भालगट यांच्याकडेच आहे. सरकारला आता जमिनीची गरज नाही. त्यामुळे संबंधित जमीन आरक्षणमुक्त करण्यात यावी. जमीन विकायची असून त्यासाठी ग्राहक तयार आहे असे न्यायालयाला सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. उच्च न्यायालयाने ३० जानेवारी २०१९ रोजी सरकारला नोटीस बजावून याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सरकारने अद्याप उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे न्यायालयाने सरकारला फटकारले व येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास २५ हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी दिली. सरकारला जमिनीची गरज आहे की नाही आणि याचिकाकर्त्याने अवॉर्डची रक्कम स्वीकारली की नाही, याची माहिती सरकारला उत्तरात द्यायची आहे. दोन्ही मुद्यांवर नकारार्थी उत्तर असल्यास सरकारने याचिकाकर्त्याची जमीन संपादनमुक्त करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.