शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हायकोर्टाने लोणार सरोवरावरून सरकारला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 10:53 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले.

ठळक मुद्देसंवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले. तसेच, लोणार सरोवराच्या संवर्धनाकरिता स्थापन विशेष समितीची पुढील बैठक येत्या २३ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या सभागृहात घेण्याचा आदेश दिला व या बैठकीमध्ये ठोस निर्णय घेऊन त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले.यासंदर्भात अ‍ॅड़ कीर्ती निपाणकर (नागपूर), गोविंद खेकाळे व सुधाकर बुगदाने (दोन्ही बुलडाणा) यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड़ आनंद परचुरे यांनी लोणार सरोवर संवर्धनाकरिता ठोस उपाय केले जात नसल्याची व विशेष समिती केवळ बैठक घेण्याची औपचारिकता पार पाडीत असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन सरकारची कानउघाडणी केली. तसेच, विशेष समितीची पुढील बैठक उच्च न्यायालयाच्या सभागृहात घ्यावी असे सांगितले. विशेष समितीमध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी, जिल्हा वनाधिकारी, औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी, मेहकर येथील उपविभागीय अधिकारी, लोणार येथील तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, याचिकाकर्ते सुधाकर बुगदाने आदींचा समावेश आहे.अन्य महत्त्वाचे मुद्देन्यायालयाने या प्रकरणात भूजल सर्वेक्षण विभागाला प्रतिवादी केले आहे. तसेच, एक महिन्यात लोणार सरोवराचे पाणी तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.लोणार सरोवराच्या पाण्यात काही वनस्पतींची झपाट्याने वाढ होत असून, ती वनस्पती हटविण्यासाठी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चाला दोन महिन्यात मंजुरी देण्यात यावी, असे निर्देश सरकारला देण्यात आले.सरदार वल्लभभाई पटेल संस्थेची लोणार सरोवर परिसरातील ज्ञानदीप शाळा पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाने स्थगिती दिली. संस्थेने या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून कारवाईला आव्हान दिले आहे. शाळा ५० वर्षे जुनी असल्याचा संस्थेचा दावा आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवर