शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : कथित पत्रकाराची शिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 21:42 IST

व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देरिव्हिजन याचिका फेटाळून लावली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसायाने पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीची दोन वर्षे कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. तसेच, या शिक्षेविरुद्ध आरोपीने दाखल केलेली रिव्हिजन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.शरद बाळकृष्ण देवतळे (५३) असे आरोपीचे नाव असून तो सेवाग्राम, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. प्रकरणातील माहितीनुसार, फिर्यादी सोनबा भैसारे यांनी १९९४-९५ मध्ये स्वत:च्या जमिनीवर ले-आऊट पाडून भूखंड विकले. ग्राहकांनी त्या भूखंडांवर घरे बांधली. दरम्यान, आरोपीने ले-आऊट अवैध असल्याच्या बातम्या छापण्याची व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची धमकी देऊन भैसारे यांना ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. भैसारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर २८ जुलै २००० रोजी सापळा रचण्यात आला व आरोपीला १० हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.या प्रकरणात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता, सत्र न्यायालयाने दोष व दंड कायम ठेवून केवळ कारावासाची शिक्षा दोन वर्षे केली. परिणामी, आरोपीने उच्च न्यायालयात रिव्हिजन याचिका दाखल केली होती. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. महेश राय यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयJournalistपत्रकार