शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांवरून हायकोर्टाने फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकार्यक्षम सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांवरून सोमवारीही राज्य सरकारला फटकारले. तसेच, या प्रकरणात न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती केली व मनोहर यांना सर्व प्रकारच्या सरकारी वकिलांच्या कामगिरीचा अहवाल देण्यात यावा, असा आदेश सरकारला दिला.

ठळक मुद्दे सहकार्यासाठी सुनील मनोहर यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकार्यक्षम सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांवरून सोमवारीही राज्य सरकारला फटकारले. तसेच, या प्रकरणात न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती केली व मनोहर यांना सर्व प्रकारच्या सरकारी वकिलांच्या कामगिरीचा अहवाल देण्यात यावा, असा आदेश सरकारला दिला.उच्च न्यायालयात बालाजी किन्हाळे यांचे फौजदारी अपील प्रलंबित आहे. त्या प्रकरणात न्यायमूर्ती रोहित देव यांना सरकारच्या बाजूने योग्य सहकार्य मिळत नव्हते. त्यांना असा अनुभव वारंवार आला होता. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन या समस्येचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तारखेला त्यांनी सरकारची कानउघाडणी केली होती. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत, हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते. परंतु, यासंदर्भात आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकरणात सरकारी वकिलांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्याकडून प्रभावी सहकार्य न मिळाल्यास त्याचा न्यायदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.ही समस्या सोडविण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना तीन प्रश्नांची उत्तरे मागण्यात आली होती. त्यात, विशिष्ट कालावधीनंतर सर्व प्रकारच्या सरकारी वकिलांची कामगिरी तपासली जाते काय, ही प्रक्रिया अस्तित्वात असल्यास सरकारी वकिलांची कामगिरी समाधानकारक आढळून येते काय व कामगिरी समाधानकारक आढळून आली नाही तर, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात येतात काय, या तीन प्रश्नांचा समावेश होता. प्रतिज्ञापत्रासोबत प्रत्येक सरकारी वकिलाच्या कामगिरीचा अहवालही मागण्यात आला होता. त्यानुसार, सरकारने सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाने ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर २६ मार्च रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल