शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : राज्य निवडणूक आयुक्तांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 22:35 IST

न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त जागेश्वर सहारिया, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना अवमानना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देमतदान केंद्रांवर दिव्यांगांची असुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंद्रधनू सामाजिक संस्था व सेवानिवृत्त शास्त्रज्ञ पी. एन. अंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल करून लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर दिव्यांगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत असा आरोप केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त जागेश्वर सहारिया, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना अवमानना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर दिव्यांगांना पोर्टेबल रॅम्प, हॅन्डरेल, व्हील चेयर्स, स्वतंत्र पार्किंग, स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. ३ एप्रिल २०१९ रोजी राज्य सरकारने याचिकाकर्त्यांची विनंती पूर्ण केली जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर न्यायालयाने संबंधित अर्ज निकाली काढला होता. त्यानंतर सरकारने न्यायालयाला दिलेल्या ग्वाहीचे पालन केले नाही. मतदान केंद्रांवर दिव्यांगांना ५ एप्रिल २००५ रोजीच्या शासन निर्णयानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दिव्यांगांची गैरसाय झाली. करिता वरील जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमानना कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सेजल लखानी यांनी कामकाज पाहिले.

 

 

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग