शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सुनील केदार यांना हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:20 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणातील आरोपी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्यासह अन्य आरोपींना सोमवारी दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती मागे घेतली. तसेच, घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिलेत.

ठळक मुद्देएनडीसीसी बँकेतील रोखे घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती हटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणातील आरोपी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्यासह अन्य आरोपींना सोमवारी दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती मागे घेतली. तसेच, घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिलेत.प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये बँकेचे माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर यांचा समावेश आहे. आरोपी चौधरी यांनी प्रकरणातील प्रथम साक्षीदार असवार यांची उलटतपासणी अपूर्ण असताना द्वितीय साक्षीदार विधाते यांची उलटतपासणी सुरू करण्यावर आक्षेप घेतला होता. चौकशी अधिकारी सुभाष मोहोड यांनी २९ मे २०१८ रोजी चौधरी यांचा त्यासंदर्भातील अर्ज खारीज केला होता. त्या आदेशाला चौधरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर ४ जून २०१८ रोजी उच्च न्यायालयाने घोटाळ्याच्या चौकशीवर स्थगिती दिली होती. तेव्हापासून चौकशी थांबून होती. आता स्थगिती हटल्यामुळे चौकशीला पुन्हा सुरुवात होणार आहे. परिणामी, आरोपींना दणका बसला आहे. याशिवाय उच्च न्यायालयाने चौधरी व केदार या दोघांनाही प्रथम साक्षीदार असवार यांची उलटतपासणी करू द्यावी, असा आदेशदेखील दिला आहे. प्रकरणावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड. हरनीश गढिया, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, केदार यांच्यातर्फे अ‍ॅड. अजय घारे यांनी कामकाज पाहिले.असे आहे प्रकरण२००१-२००२ मध्ये बँकेने होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा.लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा.लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. परंतु कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व रक्कमही परत केली नाही. याप्रकरणात २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी