शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला हायकोर्टातून पॅरोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 21:45 IST

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मो. शरीफ शब्बीर अहमद याला बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे.

ठळक मुद्देबहिणीच्या निधनाचे दिले कारणऔरंगाबादजवळ शस्त्रसाठ्यासह केली होती अटक

ऑनलाईन लोकमत

नागपूर : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मो. शरीफ शब्बीर अहमद याला बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे.मो. शरीफ हा कुख्यात दहशतवादी अबू जुंदालचा साथीदार आहे. त्याला १४ वर्षांचा कारावास झाला आहे. सध्या तो अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ८ मे २००६ रोजी महाराष्ट्र एटीएस पथकाने तीन दहशतवाद्यांना ३० किलो आरडीएक्स, १० एके-४७ रायफल्स व ३२०० बुलेटस्सह औरंगाबादजवळ अटक केली होती. त्यांच्यासोबतच्या दुसºया गाडीमध्ये अबू जुंदालही होता असा एटीएसला संशय आहे. त्यावेळी तो एटीएसच्या ताब्यात आला नव्हता. त्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला. आरोपींचा देशामध्ये मोठा घातपात घडविण्याचा हेतू होता असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान मो. शरीफचे नाव पुढे आले होते. विशेष न्यायालयाने याप्रकरणात जुंदाल व मो. शरीफसह एकूण १२ जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.मो. शरीफने बहिणीच्या मृत्यूनंतर अभिवचन रजा मिळण्यासाठी सुरुवातीला कारागृह अधीक्षकांकडे अर्ज केला होता. परंतु, तो दहशतवादी गुन्ह्यांतील कैदी असल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता मो. शरीफची याचिका मंजूर केली. मो. शरीफच्या वतीने अ‍ॅड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.