शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  बेवारस कुत्र्यांच्या हैदोसावर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:59 IST

गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपाययोजना करीत आहे अशी विचारणा केली.

ठळक मुद्देमनपाला उपायांची विचारणा : प्राण्यांचे शेल्टर होम रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपाययोजना करीत आहे अशी विचारणा केली.यासंदर्भात अंकिता शाह यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शाह यांनी बेवारस कुत्र्यांच्या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केले असल्याचे सांगितले. न्यायालयाने याविषयी वर्तमानपत्रांत बातम्या छापून येत असल्याची प्रतिक्रिया त्यावर व्यक्त केली.भांडेवाडी येथील प्राण्यांच्या शेल्टर होमच्या दूरवस्थेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. शेल्टर होममध्ये प्राण्यांसाठी आवश्यक सुविधा नाहीत. प्राण्यांची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे शेल्टर होम बंद करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांच्या याचिकेत बेवारस कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. बेवारस कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु, सध्या नसबंदी कार्यक्रम बंद आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बेवारस कुत्रे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. चावा घेणे, गाडीच्या मागे धावणे, अंगावर भुकणे इत्यादी प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गाडीच्या मागे कुत्रे धावल्यामुळे आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत असा दावा शाह यांनी केला आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने पाळीव प्राण्यांचा विषय उपस्थित केला व पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय अशी विचारणा मनपाला केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdogकुत्रा