शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा निर्णय : केळीबाग रोडवरील दुकानदारांची याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 22:35 IST

महाल येथील केळीबाग रोडवरील २५ दुकानदारांनी भूसंपादन प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेल्या दोन रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे फेटाळून लावल्या.

ठळक मुद्देभूसंपादनावर घेतला होता आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाल येथील केळीबाग रोडवरील २५ दुकानदारांनी भूसंपादन प्रक्रियेविरुद्ध दाखल केलेल्या दोन रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे फेटाळून लावल्या. तसेच, त्यांना नियमानुसार नवीन याचिका दाखल करण्याची मुभा दिली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. केळीबाग रोड २४ मीटर रुंद केला जात असून त्याला राज्य सरकारने मंजुरी प्रदान केली आहे. हा डीपी रोड आहे. रोडसाठी आवश्यक जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा व भूसंपादन कायद्यांतर्गत २७ आॅगस्ट २०१९ रोजी अधिसूचना जारी केली आहे, तर त्या आधारावर विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी ३१ आॅक्टोबर २०१९ रोजी संबंधित दुकानदारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हरीशकुमार सोमियानी व इतर आणि सुनीलकुमार चौधरी व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या रोडसाठी २४ मीटरपेक्षा जास्त जमीन संपादित केली जात आहे. त्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच, त्यांनी नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई मागितली होती. परंतु, तांत्रिक चुका केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला नाही. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.२० हजार रुपये दावा खर्चउच्च न्यायालयाने दोन्ही याचिकांमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये दावा खर्च बसवला. तसेच, ही रक्कम दोन आठवड्यात उच्च न्यायालय विधी सेवा उप-समिती नागपूरला अदा करण्याचा आदेश दिला. त्यामुळे याचिकाकर्त्यांना दणका बसला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMahalमहाल