शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : मनपा आयुक्तांविरुद्ध टँकर मालकांची अवमानना याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:47 IST

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देग्वाहीचे उल्लंघन केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. २०१७ मध्ये मनपाने टँकर मालकांना पाणीपुरवठ्याच्या समान फेऱ्या वाटप केल्या जातील, अशी ग्वाही उच्च न्यायालयाला दिली होती. त्या ग्वाहीचे उल्लंघन करण्यात आले असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर न्यायालयात नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर सुनावणी केली जाणार आहे.२३ जून २०१६ रोजीच्या ई-टेंडरनुसार शहरातील पाणीटंचाईच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मालकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१६ रोजी स्थायी समितीने या टँकर मालकांना पाणीपुरवठ्याच्या समान फेऱ्या वाटप करण्याविषयी ठराव पारित केला. दरम्यान, २०१७ मध्ये काही टँकर मालक फेऱ्या वाटपातील भेदभावासंदर्भात उच्च न्यायालयात गेले असता मनपाने स्थायी समितीच्या ठरावाचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार गेल्या मार्चपर्यंत टँकर मालकांची सेवा सुरू होती. परंतु, मार्च-२०२० मध्ये अचानक १२० टँकर मालकांची सेवा बंद करण्यात आली. त्यात याचिकाकर्त्यांचा समावेश आहे. हा निर्णय घेताना टँकर मालकांना नोटीस देण्यात आली नाही. हा निर्णय रद्द करण्यासाठी मनपाला निवेदन देण्यात आले, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. या निर्णयामुळे उच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. परिणामी, मनपा आयुक्त व इतर अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त