शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

सचिव नितीन गद्रे व अनुपकुमार यांना हायकोर्टाची अवमान नोटीस

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 14, 2024 20:09 IST

सेवा संरक्षित महिला कर्मचाऱ्याला अधिसंख्य करण्याचे प्रकरण

नागपूर : सेवा संरक्षित महिला कर्मचाऱ्याला अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गदरे (सेवा) आणि कृषी, दूग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार (कृषी) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमान नोटीस बजावून चार आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

निशिगंधा पोरेडी, असे महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्या सध्या कृषी विभागात कार्यरत आहेत. त्यांना ३० मार्च १९९५ रोजी मुन्नेरवारलू अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र जारी झाले होते. त्या आधारावर त्यांना ३१ मे १९९९ रोजी कामगार विभागामधील अनुसूचित जमातीकरिता आरक्षित सहायक पदी नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाला त्यांनी जात प्रमाणपत्र अवैध पद्धतीने मिळविल्याचे आढळले नाही. करिता, १२ जानेवारी २०१७ रोजी त्यावेळच्या कायदेशीर परिस्थितीनुसार पोरेडी यांच्या सेवेला खुल्या प्रवर्गामध्ये संरक्षण प्रदान केले गेले. पोरेडी या स्वत: किंवा त्यांची संतती भविष्यामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभासाठी दावा करणार नाही या अटीवर त्यांना हा दिलासा दिला गेला. त्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. परिणामी, त्या निर्णयाला अंतिम स्वरुप प्राप्त झाले. असे असताना, २०१९ मधील शासन निर्णयानुसार पोरेडी यांना ११ महिने कालावधीच्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले. त्यामुळे पोरेडी यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

अंतिम स्वरुप प्राप्त आदेश बंधनकारकपोरेडी यांच्या वतीने ॲड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतिम स्वरुप प्राप्त झाल्यानंतर सरकारने संबंधित आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. परंतु, या प्रकरणात सरकारने न्यायालयाचा १२ जानेवारी २०१७ रोजीचा अंतिम आदेश पायदळी तुडवला. करिता, दोन्ही सचिवांवर अवमान कारवाई करण्यात यावी आणि पोरेडी यांच्यावरील वादग्रस्त कारवाई रद्द करावी, अशी मागणी ॲड. नारनवरे यांनी न्यायालयाला केली. प्रथमदर्शनी हे मुद्दे योग्य आढळून आल्यामुळे दोन्ही सचिवांना नोटीस जारी करण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय