शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट :  सामाजिक न्याय सचिवांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:05 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि समाज कल्याण विभागाचे उपसंचालक सिद्धार्थ गायकवाड यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देआदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि समाज कल्याण विभागाचे उपसंचालक सिद्धार्थ गायकवाड यांना अवमानना नोटीस बजावली.१४ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने वर्धा येथील कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. किशोर ढोबळे, प्रा. पूनम येसंबरे व प्रा. सुभाष रंगारी यांना सेवेत कायम करण्यावर तीन महिन्यात निर्णय घेण्याचा समाज कल्याण विभागाला आदेश दिला होता. त्या आदेशाचे पालन झाले नसल्यामुळे या प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वरील अधिकाऱ्यांना यावर ११ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच, यादरम्यान ते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.याचिकेतील माहितीनुसार, या प्राध्यापकांची विविध तारखांना वेगवेगळ्या विषयांसाठी नियुक्ती करण्यात आली असून, तेव्हापासून ते अखंडपणे सेवारत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी ८ डिसेंबर २०१७ रोजी महाविद्यालयाला सेवा नियमितीकरणाचा प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे तर, समाज कल्याण विभागाने उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठवला. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी सहसंचालकांनी तो प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सोनिया गजभिये यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय