शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : दावा खर्चाच्या रकमेतून वकिलांच्या लिपिकांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:05 IST

कोरोना संक्रमणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोंदणीकृत लिपिकांना (वकिलांकडे काम करणारे) दावा खर्चाच्या २० हजार रुपयातून मदत करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला दिला.

ठळक मुद्देकोरोना संक्रमणामुळे आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोंदणीकृत लिपिकांना (वकिलांकडे काम करणारे) दावा खर्चाच्या २० हजार रुपयातून मदत करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला दिला. कोरोना संक्रमणामुळे प्रत्येक व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रभावित झाली आहे. त्यात वकिलांकडील नोंदणीकृत लिपिकांचाही समावेश आहे. सध्या न्यायालयामध्ये नियमित पद्धतीने कामकाज होत नाही. त्यामुळे लिपिकांना आवश्यक काम मिळत नाही. परिणामी, अनेक लिपिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. करिता, बार असोसिएशनने पात्र लिपिकांचा शोध घेऊन त्यांना दावा खर्चाच्या रकमेतून मदत करावी असे न्यायालयाने आदेशात सांगितले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांनी लिपिकांना हा दिलासा दिला. एकमेकांविरुद्ध नोंदवलेले एफआयआर व संबंधित खटले रद्द करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील सिराजुद्दीन बुरहानुद्दीन व इतर २४ जणांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असून त्यांनी सहमतीने वाद संपवला आहे. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांना दावा खर्चाशिवाय दिलासा देण्यास नकार दिला. त्यांच्यामुळे पोलीस यंत्रणेला या प्रकरणांच्या तपासाकरिता मौल्यवान वेळ खर्ची घालावा लागला. या वेळेमध्ये ते इतर महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास करू शकले असते, असे न्यायालयाने त्यांना सुनावले. परिणामी, अर्जदारांनी दावा खर्चापोटी एकूण २० हजार रुपये हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरकडे जमा करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर न्यायालयाने संबंधित अर्ज मंजूर केला व दावा खर्चाच्या रकमेतून लिपिकांना मदत करण्याचा आदेश दिला. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. परवेझ मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिलcorona virusकोरोना वायरस बातम्या