शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापनगरात गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जोरात बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्या आरोपीला हटकले म्हणून त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका तरुणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जोरात बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्या आरोपीला हटकले म्हणून त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका तरुणाच्या घरावर हल्ला केला. तेथे तोडफोड करतानाच आरोपींनी तरुणाला आणि त्याच्या आईला जबर मारहाण केली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडे नगरात शुक्रवारी रात्री ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. मयूर विकास सेलोकर आणि त्याची आई आरोपींच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत.

आरोपी प्रणय ऊर्फ मंत्री वसंतराव पुराम आणि त्याचा साथीदार वैभव वाघाडे हे दोघे शुक्रवारी रात्री मयूरच्या घरासमोरून जोरात बुलेट चालवून सायलेन्सरमधून फटाके फोडत होते. त्यामुळे मयूरने आरोपींना हटकले. त्याचा राग धरून आरोपी प्रणय, वैभव यांनी आपल्या सात ते आठ साथीदारांसह शुक्रवारी रात्री मयूरच्या घरावर हल्ला चढवला. त्याच्या घराच्या खिडक्यांची तोडफोड करून त्याला आणि त्याच्या आईला काठी तसेच विटा, दगडांनी हल्ला करून जबर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच प्रतापनगर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी मयूरची तक्रार नोंदवून घेत आरोपी प्रणय तसेच वैभवला अटक केली, त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.