शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हा तर आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:44 IST

उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारावर पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांचा आवश्यक डेटा राज्य शासनाला मागविला होता.

ठळक मुद्देसंघर्ष वाहिनीच्या बैठकीतील सूर : न्यायालय, रस्त्यावर लढाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारावर पदोन्नती घेतलेल्या कर्मचाºयांचा आवश्यक डेटा राज्य शासनाला मागविला होता. मात्र शासनाने जाणूनबुजून कर्मचाºयांचा डेटा सादर न केल्याने न्यायालयाने बढत्या रद्द करण्याचे आदेश दिले. एकतर ही शासनाची घोडचूक आहे किंवा सरकारचाच या निर्णयाला पाठिंबा आहे. आज पदोन्नती रद्द केली, उद्या एखादा नियम लावून आरक्षणावर हात घातला जाईल. आरक्षण संपविण्यासाठी छुपा अजेंडा राबविला जात आहे का, असा सवाल संघर्ष वाहिनीतर्फे आयोजित बैठकीत करण्यात आला.मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारे दिलेल्या बढत्या रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. तूर्तास हा निर्णय तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात आला असला तरी यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. संघर्ष वाहिनीच्या पुढाकाराने विमुक्त भटक्या जमातीतील विविध सामाजिक व कर्मचारी संघटनातर्फे रविवारी या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले. दीनानाथ वाघमारे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अ‍ॅड. वरुण कुमार, अ‍ॅड. नीतेश ग्वालबन्सी, राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, राजू चव्हाण, धनराज खडसे, धर्मपाल शेंडे, किशोर सायगन, वनिता वºहाडे, गोविंद राठोड, अनिल राऊत, शंकर फुंड, गणेश सोनुने आदी पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते.न्यायालयात पदोन्नत झालेल्या कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गेल्या १७ वर्षांपासून पदोन्नती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासन अकार्यक्षम झाले काय, असा सवाल यावेळी करण्यात आला. आरक्षण घेत असलेला समाज हा मागासवर्गीय असून वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे. त्यांना प्रतिनिधित्व मिळाले नसल्यानेच ही तरतूद करण्यात आली. त्यामुळे सरकारने हा डेटा न्यायालयात सादर करणे गरजेचे होते. मात्र तो देण्यात आला नाही. या निर्णयामुळे १३ वर्षात पदोन्नत झालेले कर्मचारी त्यांच्या पूर्वपदावर अवनत होणार असल्याने शासन प्रशासनात प्रचंड गोंधळ निर्माण होण्याची शक्यता दीनानाथ वाघमारे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे भटक्या विमुक्त समाजातील पदोन्नत झालेले हजारो कर्मचारी निर्णयामुळे दहशतीत आले आहेत. सरकारचाच या धोरणाला पाठिंबा असल्याने सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलेही तरी न्याय मिळेल याची शाश्वती काय, असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मात्र बढत्या रद्द झाल्या तर न्यायालयासोबत रस्त्यावरही लढाई लढू असा इशारा त्यांनी लोकमतशी बोलताना दिला.