शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘हायटेक’ नागपूर विद्यापीठाला मराठीचा तिटकारा, संकेतस्थळाची मराठी आवृत्ती ‘अपडेट’ नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:43 IST

 ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते.

- योगेश पांडे

नागपूर, दि. 28 -  ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते. ज्या मराठी भाषेचा सातासमुद्रापार डंका वाजत आहे, तिच्याबद्दल ‘हायटेक’ होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फारसे गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ हे विद्यापीठाला सर्व जगाशी जोडणारे माध्यम आहे. मात्र ‘आॅनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे होत असले तरी संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीकडे अधिका-यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. संकेतस्थळावर अद्यापही जुनीच माहिती उपलब्ध असून काही अपवाद वगळता येथे ‘अपडेट’ करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.

‘ई-रिफॉर्म्स’साठी नागपूर विद्यापीठाने अनेक सकारात्मक पावले उचलली. परंतु ‘आॅनलाईन’ सुधारणाचे मूलभूत अंग असलेल्या संकेतस्थळाचा मात्र हवा तसा विकास झालेला नाही. अनेकदा तर संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर प्रशासनाच्या विविध अधिसूचना, परिपत्रके ‘अपलोड’च होत नसल्याचे आढळून आले आहे. यासंबंधात प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांना कधीही जाब विचारला जात नाही हे विशेष.

अनेक विद्यार्थी विभागांची माहिती व्हावी यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतात. परंतु बºयाच विभागांची सद्यस्थितीतील माहितीच उपलब्ध नाही. अनेक विभागांमध्ये तर २ ते ३ वर्षांअगोदरची माहिती दिसून येत आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर विद्याशाखांची संख्या ४ इतकी झाली आहे. मात्र संकेतस्थळावर अद्यापही सर्व कारभार नऊ विद्याशाखांना अनुसरुनच दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे विद्यापीठाद्वारे संचालित करण्यात येत असलेल्या ‘एलआयटी’ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची संकेतस्थळावरील ‘लिंक’च उघडत नाही. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीची अडचण असते. त्यामुळे विविध माहिती मिळविण्यासाठी ते मराठी आवृत्तीची मदत घेतात. मात्र येथे चुकीची माहिती उपलब्ध आहे. यातूनच मराठी ‘आॅनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे करणाºया नागपूर विद्यापीठ संकेतस्थळाच्या बाबतीत अद्यापही हवे तसे प्रगत झालेले नाही हेच स्पष्ट होेत आहे.

काणे, वंजारी अद्याप विभागप्रमुखच...

संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीकडे विद्यापीठाचे कसे दुर्लक्ष आहे, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे विविध विभागांबाबतची अपुरी व चुकीची माहिती. डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे गेल्या सव्वातीन वर्षांहून अधिकच्या काळापासून विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तर डॉ.शशीकला वंजारी यांची मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होऊन महिना उलटून गेला आहे. मात्र दोघेही अद्यापपर्यंत अनुक्रमे सांख्यिकीशास्त्र व पदव्युत्तर शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणूनच दर्शविण्यात येत आहेत.