शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

वीरता, बलिदानाच्या भावनेचा सांगितिक आविष्कार

By admin | Updated: August 12, 2016 02:53 IST

वीरता, बलिदान, आनंद आणि रोमांच या भावनेचा सांगितिक आविष्कार असलेला आय लव्ह माय इंडिया

आय लव्ह माय इंडिया : लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट, जयहिंद फाऊंडेशन व जैन क्लबचे आयोजन नागपूर : वीरता, बलिदान, आनंद आणि रोमांच या भावनेचा सांगितिक आविष्कार असलेला आय लव्ह माय इंडिया हा विशेष कार्यक्रम आज गुरुवारी वसंतराव देशपांडे सभागृहात सादर झाला. लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्ट, जय हिंद फाऊंडेशन आणि जैन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायक देव नेगी आणि स्थानिक गायकांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनातील देशप्रेमाची ज्योत आणखी प्रज्वलित केली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मेट्रो रेल्वेचे अध्यक्ष ब्रजेश दीक्षित, आमदार कृष्णा खोपड़े, डीसीपी दीपाली मासिरकर, माजी मंत्री अनिस अहमद, गिरीश गांधी, व्यवसायी सुदत्ता रामटेके, व्यवसायी सर्वेश अग्रवाल, सुरेन्द्र लोढ़ा, जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा, जैन क्लबचे अध्यक्ष संजय पुगलिया, सचिव राजन ढड्ढा, विजयकुमार सुराना, नरेश भरुट उपस्थित होते. स्वागत सत्राचे संचालन दिलीप रांका यांनी केले. यावेळी जैन क्लबच्या डिरेक्टरीचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कलावंतांनी देशभक्तिपर गाण्यांवर नृत्य सादर केले. यानंतर नागपूरची गायिका धनश्री देशपांडे हिने ‘वैष्णव जन तो तेणे कहिए जे पीर पराई जाणे रें’गाण्याने गायनाची सुरुवात केली. यानंतर विजय चिवंडे, विक्रम जोशीने सोबतीने ‘ये देश है वीर जवानों का’ हे गीत गायले तेव्हा अवघ्या सभागृहात एक वेगळाच उत्साह संचारला. युवा पार्श्वगायक देव नेगी हा ‘बॉर्डर’चित्रपटाचे गीत ‘संदेसे आते हैं हमें तड़पाते हैं’ गात मंचावर आला. यानंतर त्याने ‘ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन’ ही गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याच क्रमात पुढे ‘जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारों’, ‘हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते’, ‘तुम जो मिल गए हो’, ‘पुकारता चला हूं मैं’, ‘आज मौसम बड़ा बेईमान है’ आदी गीत सादर केले. या गायकांना अमर रोडे, महेन्द्र ढोले, नंदू गोहाणे, अशोक टोकलवार यांनी सुरेख साथसंगत केली. या संगीत संध्येचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. या कार्यक्रमाला लोढ़ा थैरमैक्स आणि आईएआईएफडी, आर्या मैन्स, वेदा वूमेन्स वर्ल्ड, साहिल आॅप्टिकल, आॅरेंज एण्ड कॉटन, महावीर मेवावाला यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेश भरुट, संजय नाहटा, रजनीश जैन, भागचंद जैन, कमलसिंह चोपड़ा, घनश्याम मेहता, मनीष छल्लानी, जितेन्द्र गुगलिया, सुभाष कोटेचा, दिनेश छाजेड़, संजय टक्कामोरे, राकेश जैन, सुनील जैन, अनिस छाजेड़, प्रमोद,, मनीष छल्लानी, जितेन्द्र गुगलिया, सुभाष कोटेचा, दिनेश छाजेड़, संजय टक्कामोरे, राकेश जैन, सुनील जैन, प्रमोद तातेड़, लोकेश बरडिया, अरिहंत बैद, कुमार डागा, आकाश चौरिया, अश्विन जवेरी, राजू वाजूरकर, श्रीकांत ढोलके यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)