शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हिपॅटायटिस सी ग्रस्ताचे मूत्रपिंड प्रत्यारोपण

By admin | Updated: November 18, 2016 03:05 IST

एकेकाळी क्षयरोग असलेल्या व ‘हिपॅटायटिस सी’ विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे गरजूला यशस्वी मूत्रपिंड

‘सुपर’मध्ये सातवे प्रत्यारोपण यशस्वी : डॉक्टरांनी धोका पत्करून केली शस्त्रक्रियानागपूर : एकेकाळी क्षयरोग असलेल्या व ‘हिपॅटायटिस सी’ विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे गरजूला यशस्वी मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण करण्याचा मानही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मिळाला आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणातही आता अधिक गुंंतागुंतीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ घातल्याने डायलिसिसवर जगणाऱ्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरत आहे. गेल्या आठ महिन्यांत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या सात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, हे हॉस्पिटल आता खऱ्या अर्थाने ‘सुपर’ झाल्याचे बोलले जात आहे.उकंडराव खुरसंगे (वय ४५) असे मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचे नाव. उकंडराव यांना आई शांताबाई (वय ७०) यांनी आपले मूत्रपिंड दान केले.शांताबाई यांना यापूर्वी क्षयरोगाचा आजार आणि आता हिपॅटायटिस सी याची लागण झाल्याचे निदान झाले होते. हिपॅटायटिस सी हा जंतूसंसर्ग आजार आहे. याचे विषाणू, रक्त, दूषित सुयांचा पुनर्वापर, बाधित रुग्णाचे शारीरिक द्रव पदार्थ - जसे लाळ, वीर्य, योनिद्रव, मणक्यातील पाणी, पोटातील पाण्याच्या संपर्कातून, रुग्णाचे दाढीची ब्लेड किंवा टुथब्रश शेअर केल्यानेसुद्धा हे विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे हा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाचे अवयव निकामी होण्याचा धोका असतो. अशापरिस्थितीत हिपॅटायटिस सी ग्रस्ताचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करताना जोखीम दुपटीने वाढते. त्यासाठी अत्यंत बारकाईने काळजी घ्यावी लागते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘अ‍ॅँटी एचव्हीसी’ अथवा ‘डायरेक्टली अ‍ॅक्टिंग अ‍ॅँटी व्हायरस’ (डीएए) म्हणतात. पूर्वी असे मूत्रपिंड प्रत्यारोपण करताना लाखोंच्या इंजक्शनचा वापर केला जायचा. मात्र अद्ययावत उपचार तंत्रामुळे गोळ्यांद्वारेदेखील या विषाणूंना आवर घालता येतो. अशाच एका हिपॅटायटिस ग्रस्ताच्या मूत्रपिंडाचे गुरुवारी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ. संजय कोलते, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. मनीष बलवानी यांच्या नेतृत्वाखाली अधिपरिचारिका शैलजा, इंदू कांबळे, एन. महाकाळकर, हिरा नान्हे, सुरेखा बोंबाडकर, करुणा बागडे, प्रतिभा राऊत, आरती देशमुख, नेहा फुलमाळी, श्वेता वानखेडे, पल्लवी सावरकर, सुवर्णा रेवतकर, परिचर विनोद खोडे, नीलेश चौधरी, दर्शन कोल्हे, गीतेश वासेकर, मोदराज नंदेश्वर यांच्या चमूने मोलाचे योगदान दिले.(प्रतिनिधी)शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांनाही धोका असतोहिपॅटायटिस सी असलेल्या रुग्णावर कुठलीही शस्त्रक्रिया करीत असताना थोडी जरी चूक झाल्यास व काळजी न घेतल्यास डॉक्टरालाही या रोगाचा धोका होऊ शकतो. गुरुवारी झालेली शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी ती यशस्वी झाली आहे.-डॉ. संजय कोलते, किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञआज आणखी एक प्रत्यारोपणसुपरने आतापर्यंत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या सात शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. शुक्रवारी आणखी एका मूत्रपिंड विकारग्रस्तावर अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. तर पुढच्या काही दिवसांत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या आणखी दोन शस्त्रक्रिया होणार आहेत.