शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खाऊच्या पैशातून शेतकऱ्यांना मदत

By admin | Updated: September 21, 2015 02:59 IST

खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते.

नागपुरातील बालिकेची संवेदना : मुख्यमंत्र्यांनी केले कौतुकनागपूर : खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते. याच पैशातून आपल्यासाठी अन्न उगविणाऱ्या शेतकऱ्याला मदत व्हावी या भावनेतून नागपूरच्या आठ वर्षीय रसिका जोशी या बालिकेने मुख्यमंत्री मदतनिधीला सर्व पैसे दिले. खाऊच्या पैशांची रक्कम जरी छोटी असली तरी यातून तिने राज्यातील जनतेला आभाळभर मोठी अशी प्रेरणा दिली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था फारशी चांगली नाही. बॉलिवूडस्टार आमीर खान याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री मदतनिधीसाठी चेक दिला. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर रसिकाने वडील मनोज जोशी यांना विचारणा केली असता राज्यातील शेतकरी कसे संकटात आहेत व आमीर खान हा चेक त्यांच्या मदतीसाठी देत असल्याचे त्यांनी समजावून सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे शाळेतील टिफीनमधले अन्न मी खाऊ शकते, ते संकटात असल्याचे ऐकताच रसिकाच्या बालमनालादेखील वाईट वाटले व तिने कुणालाही न सांगता साठविलेले सर्व पैसे एकत्र केले. परिचितांसोबत रविवारी मुख्यमंत्र्यांकडे गेली असता रसिकाने खाऊचे पैसे साठवून ठेवलेली ‘पिगी बँक’च त्यांना सुपूर्द केली व या रकमेतून शेतकऱ्यांना मदत करा, असे सांगितले.(प्रतिनिधी)ही मौलिक मदत : मुख्यमंत्रीबळीराजाच्या मदतीसाठी एका आठ वर्षांच्या मुलीने केलेली ही मदत मौलिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या वयातील मुलीमध्ये ही संवेदना असणे हीच फार मोठी सुखावह बाब आहे. तिने दिलेली रक्कम निश्चितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. ही रक्कम लहान असली तरी यातून समाजाला निश्चितच मोठी प्रेरणा मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.