शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:50 IST

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) व नितीन शिवाजी राठोड (गोवर्धननगर,पो. बिबी) यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने मंगळवारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. दोघांच्याही पत्नींना प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला व चार अपत्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मुदतठेव करण्यात आली.

ठळक मुद्दे‘एचसीबीए’चे सामाजिक भान : वकिलांनी ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) व नितीन शिवाजी राठोड (गोवर्धननगर,पो. बिबी) यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने मंगळवारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. दोघांच्याही पत्नींना प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला व चार अपत्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मुदतठेव करण्यात आली. राजपूत यांना दोन मुले तर, राठोड यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.या उपक्रमाद्वारे शहरातील वकिलांनी पुन्हा एकदा आपले सामाजिक कर्तव्य जपले. यापूर्वी त्यांनी केरळ पूरपीडितांना मोठी आर्थिक मदत गोळा केली होती. शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी संघटनेने सोमवारी दुपारी १२.३० वाजतापर्यंतची वेळ निश्चित केली होती. त्यानंतर दोन्ही शहिदांच्या घरी जाऊन मदत प्रदान करण्यात येणार होती. परंतु, मदतीचा ओघ रात्रीपर्यंत कायम राहिला. परिणामी, दोन्ही शहिदांच्या कुटुंबीयांना मंगळवारी मदत प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. वकिलांनी या उपक्रमाला भरभरून सहकार्य करून एकजुटीचे दर्शन घडविले. संघटनेने गत शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव पारित करून, त्यात दहशतवाद्यांविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाadvocateवकिल