शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

नागपूर : मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाले असून सर्वांचे ...

नागपूर : मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

मागील २४ तासांत विदर्भात केवळ चंद्रपूर वगळता कुठेही पावसाची नोंद नाही. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील एकदोन ठिकाणी फक्त ५.४ मिमी तुरळक पावसाची नोंद आहे. विदर्भात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी दमदार पाऊस न झाल्याने पिके सुकण्याच्या बेतात आहेत. येत्या ४ ते ५ दिवसांत पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, अशी अवस्था आहे.

दरम्यान, हवामान विभागाने या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९ तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर अखेरच्या टप्प्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. यंदा दमदार पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या केल्या. मात्र, अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.नागपूर जिल्ह्यातही पावसाने दडी मारली आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. धान पऱ्हे तयार असले, तरी रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने आता पऱ्ह्यांना जगविणे सुरू आहे. धान रोवण्या अडचणीत आल्या आहेत. अन्य पिके चांगली उगवली असली, तरी जमिनीच्या ओलाव्यावर तग धरून आहेत.

नागपूरचे तापमान कालच्यापेक्षा एक अंशाने कमी म्हणजे ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. उकाडाही चांगलाच वाढलेला होता. सकाळची आर्द्रता ६७ टक्के नोंदविली गेली. सायंकाळीही ६८ टक्के नोंद झाल्याने फारसा फरक नव्हता. ... विदर्भातील तापमान

जिल्हा : कमाल : किमान

अकोला : ३८.८ : २६.०

अमरावती : ३७.२ : २५.३

बुलडाणा : ३४.४ : २३.५

चंद्रपूर : ३३.४ : २४.४

गडचिरोली : २९.४ : २६.४

गोंदिया : ३५.० : २५.२

नागपूर : ३६.३ : २६.८

वर्धा : ३७.५ : २७.५

वाशिम : ३६.० : २४.०

यवतमाळ : ३७.२ : २१.५

...