शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकार सय्यद हैदर रझा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

By admin | Updated: July 26, 2016 02:21 IST

कला आणि कलावंतांसाठी समर्पित लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे सोमवारी जगविख्यात चित्रकार सय्यद हैदर रझा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे शोकसंवेदना अर्पण नागपूर : कला आणि कलावंतांसाठी समर्पित लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे सोमवारी जगविख्यात चित्रकार सय्यद हैदर रझा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चित्रकार रझा यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. मध्य प्रदेशातील मंडला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सायंकाळी या महान चित्रकाराला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे चाहते व कलाप्रेमी उपस्थित होते. यावेळी आर्ट गॅलरीमध्ये रझा यांच्या निवडक पेंटिंग्जचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यासोबतच गेल्यावर्षी रझा यांनी लोकमतला दिलेल्या भेटीदरम्यानची छायाचित्रेही लावण्यात आली होती. सुरुवातीला कलाप्रेमींनी चित्रकार रझा यांच्या छायाचित्रासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून आपली आदरांजली अर्पण केली. यानंतर काही दिवसांपूर्वी रझा यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कलेच्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी सेवानिवृत्त आयकर अधिकारी जी.जी.ए. नायडू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ललित कला विभागाचे माजी अधिष्ठाता विनोद इंदूरकर, चित्रकार सुधीर तलमले, छापखाना ग्रुपचे मिलिंद लिंबेकर, सदानंद चौधरी, अभिषित चौरसिया, महेश मानकर, आनंद डाबली, अमोल हिवरकर, आकाश सूर्यवंशी, विशाल सोरटे आणि कलाश्रय ग्रुपचे कलावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)खुपच सज्जन व्यक्ती होते रझा साहेब महान चित्रकार रझा यांच्या कधी ना कधी संपर्कात आलेल्या कलाप्रेमींनी यावेळी आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. सेवानिविृत्त आयकर अधिकारी जी.जी.ए. नायडू यापैकीच एक होते. त्यांनी सांगितले की, रझा साहेब खुपच सज्जन व्यक्ती होते. ते सर्वांशी सहजपणे बोलायचे.